‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीला ‘भगदाड’ ? ‘या’ ९ आमदारांसह अनेक नेते भाजप-सेनेच्या वाटेवर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्र हाती घेताच महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आघाडीवर आमदारांच्या फोडाफोडीचा बॉम्ब टाकला आहे. येत्या आठवड्यात काही आमदार राजीनामा देणार असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. हा गौप्यस्फोट त्यांनी सोलापूरमध्ये केल्याने ते आमदार कोण अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे. आमदारांप्रमाणेच इतर नेते देखील भाजपाच्या वाट्यावर असल्याची चर्चा सध्या जोऱात सुरु आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर दोन्ही पक्षातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकत युतीमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या जयदत्त क्षीरसागर आणि पांडुरंग बरोरा यांच्यानंतर राष्ट्रवादीला गळती लागली आहे का ? आगामी विधानसभा निवडणुकीत इच्छूक असणाऱ्यांनी आपली पावले युतीच्या दिशेने वळवली आहेत. तर काहीजण वंचीत बहुजन आघाडीच्या संपर्कात आहेत.

‘हे’ नेते सोडणार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा हात सोडणार असल्याची चर्चा
दिलीप सोपल – बार्शी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असून ते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
बबनदादा शिंदे – माढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असून ते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
रणजित शिंदे – माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र असून ते देखील भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
दत्तात्रय भरणे – इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत. उमेदवारी नाकारल्यास ते देखील भाजपामध्ये प्रवेश करू शकतात अशी चर्चा आहे.
रमेश कदम – मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार असून ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
प्रदीप कंद – शिरुर विधानसभा मतदार संघातील विद्यमान जि.प. पदाधिकारी आहेत. आगामी विधानसभेसाठी ते इच्छूक असून राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यास भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
चेदनसिंह केदार – राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक असून ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
संग्राम जगताप – दक्षीण अहमदनगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत. ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
अवधूत तटकरे – खासदार सुनिल तटकरे यांचे पुतणे आणि श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून इच्छूक असून ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
ज्योती कलाना – उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार असून त्या भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
भारत भालके – पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार असून ते भाजपा किंवा शिवसेना पक्षाच्या प्रवेशाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
सिद्धराम म्हेत्रे – अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार असून ते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
जयकुमार गोरे – माण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार असून ते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like