धक्कादायक ! दारू न मिळाल्यानं 10 दिवस ढोसलं सॅनिटायझर, 9 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दारू मिळाली नाही म्हणून सॅनिटायझरचे सेवन केल्याने 9 जणांचा मृत्यू झाला आहे. हि घटना आंध्र प्रदेश राज्याच्या प्रकाशम जिल्ह्यातील कुरीचेडू गावात घडलीय. मृतांचे वय 25 ते 65 दरम्यान आहे, अशी माहिती समोर आली आहे.

मागील 10 दिवसांपासून या गावातील 20 लोक सॅनिटायझरचे सेवन करत होते. या सगळ्यांना त्रास व्हायला लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले. बुधवारी (29 जुलै रोजी) सॅनिटायझर प्यायल्यामुळे पहिला एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर गुरुवारी (30 जुलै रोजी) एकाच दिवसात तिघांचा मृत्यू झालाय. तर, आज सकाळी 6 लोकांचा सॅनिटायझरचे सेवन केल्याने मृत्यू झाला आहे.

कुरीचेडू गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने 10 दिवसांपासून कडक लॉकडाऊन केला होता. त्यामुळे गावातील दारूची दुकानं बंद होती. आंध्र प्रदेश राज्य सरकारने 4 मेपासून राज्यातील दुकाने सुरू केली होती. मात्र, कुरीचेडू गावामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानंतर पुन्हा लॉकडाऊन केले आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी गावातल्या दुकानातील सॅनिटायझर जप्त करून लॅबला पाठवले आहे. पोलीस कुरीचेडू गावात लोकांची चौकशी करत आहेत. तसेच किती जणांनी सॅनिजायझरचे सेवन केले आहे?, याची माहिती घेत आहेत. मात्र, मृततांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे की, काही दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू सॅनिटायझरच्या सेवनाने की इतर बाबीमुळे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.