पुण्यातील ९ पर्यटकांना गोव्यात अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

गोव्यात अल्पवयीन मुलीशी छेडछाड आणि अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याप्रकरणी पुण्यातील ९ पर्यटकाना गोवा येथे अटक करण्यात आली आहे. त्यांना गोव्यातील कलंगुट येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलीचे फोटो काढण्याच्या कारणावरुन पुण्यातील पर्यटक आणि मारहाण झालेला अल्पवयीन मुलगा यांच्यात वाद झाला होता. या घटनेची नोंद गोव्यातील कलंगुट पोलीस ठाण्यातमध्ये दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , २९ मे रोजी अल्पवयीन मुलगी आपल्या भावासोबत कलंगुट बीच वर आली होती. समुद्रकिनारी फिरत असताना पुण्याहून आलेल्या ११ पर्यटकांनी  छेडछाडीच्या उद्देशाने तिचे फोटो काढण्याचा प्रयत्न करीत होते. हा प्रकार मुलीच्या भावाच्या लक्षात आल्याने त्याने विचारपूस करण्यास सुरुवात केली. त्यांच्यात वादविवादाला सुरुवात झाली. हा वाद विवाद इतका वाढला की, आरोपींनी त्या मुलाला जबर मारहाण केली त्यानंतर अल्पवयीन मुलगी आणि तिच्या भावाने पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी लगेच कारवाई करीत आरोपींना अटक केली. ज्या मोबाईलमधून मुलीचे फोटो काढण्यात आले होते तो मोबाईल पोलिसांनी मोबाईल जप्त केला आहे.

हे आहेत आरोपी

भांडणानंतर आरोपी पुण्याला पसार होण्याच्या तयारीत होते. पण गोवा पोलिसांनी वेळीच कारवाई करीत त्यांना पकडले. आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलानाचा समावेश आहे.  रमेश कमबल, संकेत भडाले,  कृष्णा पाटिल, सत्यम लम्बे,  अनिकेत गुरुव, ऋशिकेष गुरुव, आकाश सुवसकर, सनी मोरे आणि ईश्वर पंगारे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.