राज्यातील 9 वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

मकरंद रानडे, सेनगांवकर, शिसवे यांना पदोन्‍नती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने आज (शुक्रवारी) 9 वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यापैकी काही पोलिस उप महानिरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांना विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे.

पदोन्‍नतीने बदली झालेल्या पोलिस अधिकार्‍यांची नावे आणि त्यापुढील कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे.

रविंद्र पी. सेनगांवकर (अप्पर पोलीस आयुक्‍त, दक्षिण विभाग, पुणे शहर ते पोलीस आयुक्‍त, रेल्वे, मुंबई – पदोन्‍नतीने), डॉ. रविंद्र ए. शिसवे (अप्पर पोलीस आयुक्‍त, संरक्षण व सुरक्षा, बृहन्मुंबई ते सह पोलीस आयुक्‍त, पुणे शहर – पदोन्‍नतीने), मकरंद मधुसुदन रानडे (अप्पर आयुक्‍त, पिंपरी-चिंचवड ते विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती (सध्याचे पोलीस उप महानिरीक्षक, अमरावती हे पद उन्न्त करून) – पदोन्‍नतीने) आणि राजेश प्रधान (अप्पर पोलीस आयुक्‍त, उत्‍तर विभाग, बृहन्मुंबई ते विशेष पोलीस महानिरीक्षक, आस्थापना, महाराष्ट्र राज्य, मुंबई – पदोन्‍नतीने)

बदली झालेल्या विशेष पोलीस महानिरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे.
राजकुमार व्हटकर (विशेष पोलीस महानिरीक्षक, आस्थापना, मुंबई ते सह पोलीस आयुक्‍त, नवी मुंबई), निकेत कौशिक (पोलीस आयुक्‍त, रेल्वे, मुंबई ते विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र), मधूकर पाण्डे (सह आयुक्‍त, ठाणे शहर ते सह आयुक्‍त, वाहतुक, बृहन्मुंबई), नवल बजाज (विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, ठाणे ते सह पोलीस आयुक्‍त, प्रशासन, बृहन्मुंबई) आणि सुरेश मेखला (सह पोलीस आयुक्‍त, नवी मुंबई ते सह पोलीस आयुक्‍त, ठाणे शहर).