राज्यातील ६ विशेष पोलिस महानिरीक्षकांना अप्पर महासंचालकपदी बढती तर ३ अप्पर महासंचालकांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने आज अति वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. ९ विशेष पोलिस महानिरीक्षकांना अप्पर पोलिस महासंचालकपदी बढती देण्यात आली असुन त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य पोलिस दलामध्ये मोठे बदल झाले आहेत.

अप्पर पोलीस महासंचालक म्हणून बढती मिळालेल्या विशेष पोलिस महानिरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात अप्पर पोलीस महासंचालक म्हणून कोठे बदली झाली आहे हे पुढील प्रमाणे आहे. आशुतोष के. डुम्बरे (सह पोलिस आयुक्‍त, गुन्हे, बृहन्मुंबई ते अप्र पोलिस महसंचालक, लाचलुपत प्रतिबंधक विभाग,मुंबई), डॉ. सुखविंदर सिंह (विशेष पोलिस महानिरीक्षक, फोर्स-१ ते अप्पर पोलिस महासंचालक, फोर्स-१, मुंबई – सध्याचे पद उन्‍नत करून), देवेन भारती (सह पोलिस आयुक्‍त, आर्थिक गुन्हे शाखा, बृहन्मुंबई ते अप्पर पोलिस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई), अनुप कुमार सिंह (विशेष पोलिस महानिरीक्षक, प्रशासन, मुंबई ते अप्पर पोलिस महासंचालक व दक्षता अधिकारी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, मुंबई), विनीत अग्रवाल (विशेष पोलिस महानिरीक्षक-प्रतिक्षाधीन ते अप्पर पोलिस महासंचालक, राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई), सुनिल रामानंद (विशेष पोलिस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई ते अप्पर पोलिस महासंचालक, सुधार सेवा, पुणे).

बदल्या झालेल्या ३ अप्पर पोलिस महासंचालकांची नावे आणि त्यापुढील कंसात बदलीचे ठिकाण पुढील प्रमाणे :  डॉ. प्रज्ञा सरवदे (अप्पर पोलिस महासंचालक, प्रशासन, मुंबई ते अप्पर पोलिस महासंचालक, व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित मुंबई), अतुलचंद्र कुलकर्णी (अप्पर पोलिस महांसचालक, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई ते अप्पर पोलिस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), संजीव के. सिंघल (अप्पर पोलिस महसंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते अप्पर पोलिस महासंचालक, प्रशासन, मुंबई)

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like