१ ली पासून ‘एकत्र’ असलेल्या ‘त्या’ ९ ‘जीवलग’ मित्रांचा ठरला ‘तो’ शेवटचा फोटो !

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – सोलापूर महामार्गावर कदमवाक वस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायती समोर कार आणि ट्रकच्या धडकेत झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक बसल्याने झालेल्या या अपघातात गाडीतील नऊ मित्रांचा जागीच मृत्यू झाला. सर्व मृत मित्र हे रायगडला फिरण्यासाठी गेले होते. त्यांच्या या अपघाती मृत्यूने गावावर शोककळा पसरली असून त्यांचा एक शेवटचा सेल्फी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी रायगडावरून निघाल्यानंतर हा शेवटचा फोटो काढला होता. मात्र हाच फोटो आता त्यांचा शेवटचा ठरला.

दौंड तालुक्यातील यवतचे हे सर्व तरुण रायगडला इर्टिकामधून फिरायला गेले होते. त्यानंतर घरी परतत असताना मध्यरात्री एकच्या सुमारास काळाने त्यांच्यावर घाला घातला. या मित्रांपैकी तीन जण हे लोणी काळभोरमधील कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. तर त्यातील दोन जण हे पुण्यातील  जेएसपीएमएस कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. त्यामुळे आयुष्याची सुरुवात सोबत करणाऱ्या या नऊ मित्रांच्या आयुष्याची शेवट देखील सोबतच झाल्याने सर्व जण हळहळ व्यक्त करत आहेत.

अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे :

परवेझ आशपाक अतार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकात घिगे, दत्ता गणेश यादव, जुबेर मुलाणी, अक्षय भरत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकात वाबळे, सोनू उर्फ नूरमहद अब्बास दाया.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like