पुणे सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात, ९ महाविद्यालयीन विद्यार्थी ठार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -(अब्बास शेख) सोलापूर महामार्गावर कदम वाकवस्ती (ता. हवेली) येथील ग्रापंचायत कार्यालयासमोर कार  व ट्रक यांची सामोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात नऊ जण जागीच ठार झाले आहेत. कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या  ट्रकला धडक दिली असून अपघातात कारमधील सर्व जण मृत पावले आहे. ते सर्व दौंड तालुक्यातील यवत येथील राहणारे होते़.

अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महमद आशपाक अत्तार, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत गिघे, दत्ता गणेश यादव, व जुबेर अजित मुलांनी अशी मुत्यु पावलेल्याची नावे आहेत.

हे सर्व जण रायगडमध्ये फिरायला गेले होते. तेथून परत येत असताना पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.या सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात आणण्यात आले आहेत़ या अपघातामुळे यवत शहरावर शोककळा पसरली असून संपूर्ण गाव बंद आहे.