महसुल विभागाने जप्त केलेले वाळूचे ९ ट्रक चोरीला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात महसुल विभागाकडून वारंवार कारवाई केली जाते. बेकायदा वाळू वाहतूक करणारे हे ट्रक जप्त केले जातात. तेव्हा त्यातील एखादा ट्रकचालक तो घेऊन पळून जातो. पण, महसुल विभागाने कारवाई करुन जप्त केलेले वाळूचे ९ च्या ९ ट्रक चोरुन नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे त्यात सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील ट्रकचा समावेश असून ते पुण्यात येऊन बेकायदा वाळू वाहतूक करीत असल्याचे दिसून आले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’64a92fe0-c5fc-11e8-94cd-f72d31df103a’]

हडपसर पोलिसांनी या ट्रकचालक व मालकांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हवेली तहसील कार्यालयातील मंडल अधिकारी तेजस्विनी मंगेश साळवेकर (वय ३९, रा. ग्रीन व्हॅली, बावधन) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, हवेली तहसील कार्यालयामार्फत सोलापूर रोडवर बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकला अडवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. सोमवारी १ आॅक्टोंबरला तेजस्विनी साळवेकर यांच्या नेतृत्वाखाली या वाळूच्या ट्रकवर कारवाई करण्यात येत होती. त्यांनी दुपारी साडेतीन वाजता शेवाळवाडी येथे यातील ९ ट्रकावर कारवाई करुन ते ताब्यात घेतले व एका ठिकाणी ते उभे करण्यास सांगण्यात आले. त्यात एम एच १२ के पी ६७०७, एम एच १२ एच डी ४५०२, एम एच १२ एफ झेड ९१७४, एम एच १२ ४६६०, एम एच १२ डी टी ९२००, एम एच १३ आर ४४३८, एम एच ४२ टी ८१०९, एम एच १६ ए वाय ९९०८, एम एच १४ डी एम ०७७८ या ९ ट्रकचा समावेश होता.

मुख्यमंत्र्यांना राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य नाही : शरद पवार

त्यांच्यावर कारवाई करुन ती एका ठिकाणी ठेवण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी आणखी काही ट्रक वाळू वाहतूक करीत असल्याचे समजल्यावर हवेली महसुलचे कर्मचारी सोलापूर रोडवर आले असताना या सर्वांनी हे ट्रक घेऊन कर्मचाऱ्यांना गुंगारा देत पळवून नेले. ४८ लाख १८ हजार ६०० रुपयांचे ९ ट्रक चोरुन नेल्याची फिर्याद देण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B071NB4PGV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f70381b6-c5fd-11e8-91ac-5f86ca641c7b’]

या ९ ट्रकपैकी ५ ट्रक पुण्यातील असून अहमदनगर, सोलापूर, पिंपरी चिंचवड, बारामती येथे अन्य ४ ट्रकची नोंदणी करण्यात आली आहे. सोलापूर, अहमदनगर  जिल्ह्यात बेकायदा वाळू उपसा करुन हे ट्रक सोलापूर रोडवरुन विना अडथळा थेट पुणे शहरापर्यंत पोहचले होते. वाटेत त्यांना कोठेही अडविण्यात आले नाही की त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले. अथवा हे ट्रक पुणे जिल्ह्यातच बेकायदा वाळू उपसा करीत होते, याची माहिती उपलब्ध झाली नाही. हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय झंझाड अधिक तपास करीत आहेत.

जाहिरात