9 Way to Secure Social Media Accounts | PM Modi यांचे Twitter अकाऊंट दुसर्यांदा हॅक ! 9 पद्धतीने केली जाऊ शकते हॅकिंग, प्रोफाईल ‘या’ पध्दतीनं ठेवा सुरक्षित, जाणून घ्या

नवी दिल्ली : 9 Way to Secure Social Media Accounts | आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात सोशल मीडिया अकाऊंट हॅक होणे (hacking of social media accounts) सामान्य बाब झाली आहे. हे इतके सोपे झाले आहे की, आता देशाच्या पंतप्रधानांचे ट्विटर अकाऊंट सुद्धा सुरक्षित नाही (PM Modi’s Twitter account was hacked). शनिवार रात्री उशीरा पीएम मोदी यांचे ट्विटर अकाऊंट काही काळासाठी हॅक करण्यात आले होते आणि बिटकॉईन (Bitcoin) लीगल करण्याचा मेसेज सुद्धा टाकण्यात आला होता. (9 Way to Secure Social Media Accounts)
मात्र काही वेळातच ते सुरक्षित करण्यात आले. यापूर्वी सप्टेंबर 2020 मध्ये सुद्धा पीएम मोदी (PM Modi), जुलैमध्ये जो बायडेन, बराक ओबामा, बिल गेट्स आणि एलन मस्क (Joe Biden, Barack Obama, Bill Gates and Alan Musk) यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. अखेर हॅकर (Hackers) ट्विटर अकाऊंट हॅक कसे करतात आणि यापासून कसा बचाव करू शकता, ते जाणून घेवूयात…
हॅकर्स कसे हॅक करतात अकाऊंट
हॅकर्स नेहमीच लोकांचे अकाऊंट हॅक करण्यासाठी विविध पद्धती अवलंबतात. प्रथम म्हणजे, जर सोशल मीडिया अॅप्लिकेशनमध्ये एखाद्या प्रकारचा लूपहोल असेल तर टेक्निकल फ्लॉसचा फायदा घेऊन हॅकर्स (Hackers) अकाऊंट हॅक करतात. मात्र, सोशल मीडिया कंपन्यांकडे चांगली टीम असते, तरीसुद्धा हॅकर्स लूपहोलचा शोध लावतात. (9 Way to Secure Social Media Accounts)
याशिवाय दुसरा ऑपशन फिशिंग ट्रॅप असतो. हॅकर्स कॉल किंवा मेसेज करून तुम्हाला फिशिंग लिंक शेयर करतात आणि यावर क्लिक करून जर तुम्ही लॉगिन केले तर हॅकर्स अकाऊंटचा ID आणि पासवर्ड चोरू शकतात आणि लॉगिन करून तुमच्याकडून ओटीपी घेऊ शकतात.
कसे समजते तुमचे अकाऊंट हॅक झाले किंवा नाही
तुमचे Facebook आणि Twitter सारख्या सोशल मीडिया अकाऊंट हॅक केले आहे किंवा नाही हे काही माध्यमातून जाणून घेऊ शकता. जर तुम्हाला लॉगिन करण्यात अडचण येत असेल, एखादी अशी पोस्ट दिसत असेल जी तुम्ही केलेली नाही.
तुमच्या माहिती शिवाय कुणाला मेसेज करण्यात आला असेल आणि नवीन गेम आणि अॅपचे वारंवार मेसेज येऊ लागले असतील.
जर या गोष्टी होत असतील तर तुमचे अकाऊंट हॅक झालेले असू शकते.
या पद्धतीने हॅकिंगपासून होईल बचाव
1. आपल्या अकाऊंटचा स्ट्रॉंग पासवर्ड बनवा.
2. टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन ऑन ठेवा.
3. अकाऊंटवर वेगवेगळे आयडी ईमेल बनवा.
4. कोणत्याही फिशिंग लिंकवर क्लिक करू नका.
5. कोणत्याही रिमेंबर पासवर्डचा वापर करू नका.
6. सर्व अकाऊंट वेगवेगळा पासवर्ड बनवा.
7. ब्राऊजर हिस्ट्री डिलिट करा आणि अँटी व्हायरस प्रोग्राम वापरा.
8. पब्लिक वायफाय वापरू नका.
9. सायबर कॅफेत लॉगिन करू नका.
Web Title :- 9 Way to Secure Social Media Accounts | prime minister narendra modi twitter account hacked these 10 ways will make your account secure
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 39 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी
- Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 96 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
- Mhada Exams Paper Leak Case | ‘म्हाडा’च्या पेपर फुटी प्रकरणानंतर कोचिंग क्लासेस पोलिसांच्या ‘रडार’वर (Video)