Coronavirus : ट्रायल पूर्ण न करता ‘या’ चिनी कंपनीनं आपल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना दिली ‘लस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूच्या लसीबाबत बर्‍याच देशांकडून चांगल्या बातम्या येऊ लागल्या आहेत. चीनची सायनोव्हॅक बायोटेक कंपनी देखील आपल्या लसीची वेगाने चाचणी करीत आहे. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सायनोव्हॅकच्या जवळपास 90 टक्के कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी या लसीचा डोस घेतला आहे. जुलैमध्ये सुरू करण्यात आलेल्या आपत्कालीन कार्यक्रमाअंतर्गत ही लस लोकांना दिली जात आहे.

या लसीच्या आपत्कालीन उपयोग कार्यक्रमाबद्दल काही माहिती कंपनीने शेअर केली आहे. कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे की कोरोना विषाणूच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन ही प्रायोगिक लस कामगारांना दिली जात आहे. लसची चाचणी अद्याप सुरू आहे. या लसीचा आपत्कालीन कार्यक्रम वैद्यकीय कर्मचारी, फूड मार्केटमध्ये काम करणारे लोक, वाहतूक आणि सेवा क्षेत्रातील लोकांसाठी आहे.

सायनोव्हॅकची लस कोरोनाव्हॅकच्या तिसर्‍या टप्प्याची चाचणी चालू आहे. लसीची आपत्कालीन योजना देखील या चाचणीचा एक भाग आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यिन वेदोंग यांनी रॉयटर्सला सांगितले की ही लस सुमारे 2000 ते 3000 कर्मचार्‍यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना ऐच्छिक तत्त्वावर दिली गेली आहे. या लसीच्या आकडेवारीवर यिन वेदोंग म्हणाले, ‘आपत्कालीन कार्यक्रमातील डेटा याचा पुरावा देऊ शकतो की हे सुरक्षित आहे की नाही. हा डेटा नोंदणीकृत क्लिनिकल चाचणी प्रोटोकॉलचा भाग नाही, म्हणून कमर्शियल वापरास मान्यता देताना नियामक याचा डेटा पाहत नाहीत.

यिन म्हणाले की लसीच्या आपत्कालीन कार्यक्रमात भाग घेतलेले कर्मचारी, त्यांची पत्नी आणि आई-वडील यांना या लसीच्या साइट इफेक्टबाबत आधीच माहिती देण्यात आली होती. यिन यांनी सांगितले की त्यांनी स्वत;ही या लसीचा एक डोस घेतला आहे. यिन यांनी सांगितले की लसीकरण होण्यापूर्वी डॉक्टरांनी या स्वयंसेवकांकडून त्यांच्या आरोग्याविषयी संपूर्ण माहिती घेतली होती. लस घेतल्यानंतर या लोकांवर फारच किंचित दुष्परिणाम दिसून आले. लसीच्या आपत्कालीन चाचणीत सुमारे 600 लोक सहभागी झाले होते.

कोरोनाव्हॅकच्या मधल्या टप्प्यातील चाचण्यांच्या परिणामांवरून असे दिसून आले की लसीच्या दुष्परिणामांमध्ये थकवा, ताप आणि वेदना यासारख्या लक्षणांचा समावेश आहे. यापैकी बहुतेक लक्षणे अतिशय सौम्य असल्याचे दिसून आले. दरम्यान कोरोना विषाणूच्या कोणत्याही लसीने अद्याप आपली अंतिम चाचणी पूर्ण केलेली नाही जेणेकरुन ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहे अशी माहिती मिळू शकेल.