‘कोरोना’ची दहशत ! रक्ताच्या नात्यातील माणसांनीच 90 वर्षाच्या आजीला जंगलात टाकून दिलं, महाराष्ट्रातील घटना

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या काळात मानवतेचे दर्शन देणारे अनेक प्रसंग आपण ऐकले आहेत. चालत चालेल्या अथवा नोकरी गेलेल्या मजुरांच्या मदतीसाठी अनेकांनी हात पुढे केले. काहींनी आर्थिक स्वरुपात मदत केली. तसेच आजही काही मानवतावादी संघटना नागरिकांना मदत करत आहे. दुसरीकडे औरंगाबाद मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ९० वर्षीय आईला कोरोनाची लागण झाली म्हणून नातेवाईकांनी तिला जंगलात सोडून तिथून पळ काढला आहे.

कच्चीघाटी परिसरात ही घटना घडली आहे. सदरील वृद्ध महिलेस कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झाले होते. ९० वर्षीय या महिलेची अवस्था पूर्वीपासून बिकट होती. तसेच वय झाल्याने या वृद्ध महिलेस हालचाल करणे सुद्धा कठीण झाले होते. अशा वेळी या महिलेबाबत शासकीय रुग्णालयात कळवणे अथवा दाखल करणे आवश्यक होते. पण नातेवाईकां कडून एका गोधडीत या वृद्ध महिलेला जंगलात सोडून देण्यात आले होते. त्यानंतर नातेवाईक तिथून फरार झाले.

दरम्यान, जंगल परिसरामध्ये राहत असलेल्या नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला असता त्यांनी या यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या महिलेला ताब्यात घेतले. त्यानंतर या वृद्ध महिलेला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. या महिलेवर सध्या कोरोनाचे उपचार सुरु आहेत. मरणासन्न अवस्थेत जंगलात टाकलेल्या महिलेच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे. वृद्ध महिलेसोबत केलेल्या वर्तनामुळे परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like