६०० मोदी विरोधक कलाकारांविरोधात शंकर महादेवन, अनुराधा पौडवाल यांच्यासह ‘हे’ ९०० मोदीसमर्थक कलाकार एकवटले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकतेच देशातील ६०० कलाकर आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधी एकवटले आहेत. पंतप्रधान मोदींना आणि त्यांच्या मित्रपक्षांना मतदान करू नये असं आवाहनही त्यांनी केलं होतं. त्यानंतर आता तब्बल ९०७ कलाकार आणि साहित्यिक नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ एकवटले आहेत. या कलाकरांनी मोदींनी समर्थन देत भारतीय जनता पक्षालाच मत देण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. आपल्याला मजबूर सरकार नको आहे, तर आपल्याला एक मजबूत सराकर हवे आहे असे त्या कलाकरांनी म्हटले आहे

ज्या ९०७कलाकरांनी मोदींना समर्थन दिले आहे त्यात अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. गायक-संगीतकार शंकर महादेवन, नाट्यकर्मी वामन केंद्रे, शिल्पकार राम सुतार, पंडित जसराज, अभिनेत्री कोयना मित्रा, अभिनेत्री पल्लवी जोशी, बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय, गायिका अनुराधा पौडवाल, गीतकार अभिजीत भट्टाचार्य, राहुल रॉय, विजयलक्ष्मी कृष्णन, संतूरवादक कमल गोएंका, अभिनेत्री सुश्मिता मुखर्जी आणि संगीतकार सुनिल कौशिक यांच्यासह ९०७ कलाकारांनी एक परिपत्रक जारी केलं आहे. त्या पत्रकात त्यांनी भारतीय जनता पक्षाला मत देण्याचे आवाहन केले आहे.

काही दिवसांपूर्वीच नसीरुद्दीन शाह, अमोल पालेकर यांच्यासह ६०० कलाकार मोदींविरोधात एकवटले होते. त्यांनी मोदींना आणि मित्रपक्षांना मतदान न करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता ९०० कलाकारांनी मोदींना समर्थन दिले आहे.