खळबळजनक ! ‘या’ घरात सापडला तब्बल 900 वर्षांपुर्वीचा ‘तक्षक’ नाग, जाणकारांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लखीमपूर जिल्हा मधील मैलानी भागातील एका घरातून एक दुर्मिळ प्रजातीचा नाग भेटला आहे. हा नाग एवढा विषारी आहे. याच्या विषाचा केवळ एक थेंब शेकडो लोकांचा जीव घेऊ शकतो. ह्या सापाचे नाव ‘तक्षक नाग’ असे आहे. असे सांगितले जात आहे कि, ह्या सापाचे वय ९०० वर्ष आहे. सापाला घरात पाहून लोकांमध्ये भीती पसरली. नंतर वन विभागाच्या टीम ने या दुर्मिळ अशा नागाला दुधवा टाइगर रिज़र्व च्या वनामध्ये सोडून दिले आहे. वन विभागाचे डेप्युटी रेंजर गणेश शुक्ला म्हणाले की, हा एक अतिशय दुर्मिळ नाग आहे. हा शेकडो वर्षांचा जुना असून तो अती विषारी साप आहे.

त्याचं झालं असं कि, सोमवारी रात्री उशिरा जेव्हा एका व्यक्तीला घराच्या अंगणात तब्बल बारा इंचाचा तक्षक नाग दिसल्यामुळे सगळीकडे गडबड उडाली. जाणकारांनी असे सांगितले कि, हा ९०० वर्ष जुना साप असू शकतो. वनविभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि तक्षक नागला सुमारे १ तासाच्या अथक प्रयत्नानंतर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले.

याच्या विषाचा एक थेंब शेकडो लोकांचा घेऊ शकतो जीव

वन विभागाचे डेप्युटी रेंजर गणेश शुक्ला म्हणाले की, हा एक अतिशय दुर्मिळ नाग आहे. याच्या विषाचा एक थेंब शेकडो लोकांचा जीव घेऊ शकतो. हा दुर्मिळ नाग शेकडो वर्ष जुना असून तो अती विषारी साप आहे. तक्षक नागाचे मिळणे वनातील इतर वन्यजीवांसाठी अतिशय आनंददायी आहे. शुक्ला म्हणाले कि, आम्हाला एका घरात असल्याचे समजले असता आम्ही तिकडे धाव घेतली. तिथे गेल्या नंतर आम्हाला असे समजले कि, हा एक तक्षक नाग असून तो अतिशय दुर्मिळ प्रजातीचा आणि खूप विषारी आहे. हा असाच दिसत नाही. जंगलातून तो लिकांमध्ये आला असेल.

आरोग्यविषयक वृत्त –