काय सांगता ! होय, तब्बल 8 तास रांगेत उभी होती 90 व्या दशकातील ही ‘टॉप’ची हिरोईन, कोणीच ओळखलं नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 90 च्या दशकातील अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री एक सुपरहिट हिरोईन होती. आपल्या अदाकारी आणि सोंदर्याच्या बळावर तिने खूप लोकप्रियता मिळवली. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. मात्र लग्नानंतर या अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला. मिनाक्षी जरी चित्रपटात दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. सध्या मिनाक्षीचे ट्विट चर्चेचा विषय बनला आहे.

मिनाक्षीने ट्विटरवरील एका पोस्टमध्ये फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी रांगेत उभी दिसत आहे. या फोटोला तिने कॅप्शन दिले आहे की, ‘आठ तासांपासून मी रांगेत उभी आहे. पण कुणीच मला ओळखले नाही. ही आहे अमेरिका’

या फोटोसोबत तिने आणखी एक फोटो शेअर केला आहे. याच मिनाक्षी तिचा नंबर येण्याची वाट पाहत आहे. मिनाक्षी सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी आहे. 1995 मध्ये मिनाक्षीने अमेरिकेत राहणारा इनव्हेस्टमेंट बॅंकर हरिश मैसूरसोबत लग्न केले. लग्नाची बातमी तिने अनेक वर्ष गुलदस्त्यात ठेवली होती.

लग्नानंतर देखील तिने चित्रपटात काम केले आहे. काही वर्षानंतर तिच्या लग्नाचा खुलासा झाला. अचानक मिनाक्षीने बॉलिवूड सोडून पतीसोबत परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. यानंतर ती चित्रपटात दिसली नाही. मिनाक्षीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मिनाक्षीने चित्रपटात काम करणे जरी सोडले असले तरी तिने आपली नृत्याची आवड जोपासली आहे. टेक्सासमध्ये स्थायिक झालेल्या मिनाक्षीने तेथे कथ्थक अकादमी उघडली असून तरुणींना नृत्याचे धडे देते.

2015 मध्ये ऋषी कपूर यांनी मिनाक्षीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोत मिनाक्षीला ओळखणे कठीण झाले होते. खुद्द ऋषी कपूर यांनी सुरुवातीला मिनाक्षीला ओळखले नव्हते. मिनाक्षीला इतके बदललेले बघून त्यांनाही धक्का बसला होता.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/