‘लाइमलाइट’पासून दूर राहून जीवन जगतायेत 90 च्या दशकातील ‘हे’ 6 कलाकार, 27 वर्षानंतर कशी दिसत असेल ‘चंद्रकांता’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 90 चे दशक हे चित्रपट आणि संगीतविश्वासाठी खूप महत्वाचे दशक होते. यावेळी अनेक चित्रपट आणि सुपरहिट संगीत अल्बमचा जलवा पहायला मिळाला. तसेच या काळात अनेक सुपरहिट टीव्ही सिरीयल देखील आल्या. ज्यामध्ये चंद्रकांता, शक्तिमान अशा अनेक सिरियलचा समावेश आहे. मात्र गेल्या काही काळापासून अशा प्रसिद्ध सिरीयल मधील कलाकार प्रसिद्धी झोतापासून खूपच लांब आहेत. जाणून घेऊयात अशाच काही महत्वाच्या कलाकारांबाबत.

शक्तिमान- मुकेश खन्ना
महाभारतानंतर 90 च्या दशकामध्ये मुकेश खन्ना यांनी पुन्हा जोरदार पुनरागमन केले आणि ते प्रत्येक मुलाच्या आवडीचे झाले. कारण त्यावेळी सुरु झालेले शक्तिमान आजही कित्येकांना आठवते. त्यावेळी मुले शक्तिमान प्रमाणे स्टाईल करण्याचा प्रयत्न देखील करत होते. मुकेश खन्ना सध्या मुंबईमध्ये ऍक्टिंग स्कूल चालवतात ज्याचे नाव आहे शक्तिमान इंस्टीट्यूट ऑफ एक्टिंग फॉर फिल्म अँड टेलीविजन इन ज्वाइंट वेंचर ऑफ के. एच. एंटरटेनमेंट.

सीजेन खान- कसौटी जिंदगी के
‘कसौटी जिंदगी के’ या सिरियलमुळे प्रसिद्ध झाले. या मालिकेत अनुराग आणि प्रेरणा ही जोडी लोकांना आवडली. यानंतर काय झाले, यानंतर पिया के घर जाना है, एक लड़की अंजानी सी आणि सीता और गीता या सीरियलमध्ये देखील ते दिसून आले. मात्र गेली अनेक वर्षांपासून सिजेन प्रसिद्धी झोतापासून खूप दूर आहेत.

शिखा स्वरुप – चंद्रकांता
शिखा स्वरुप 1994 ते 1996 पर्यंत टीव्हीवर प्रसारित झालेल्या चंद्रकांताची लीड ऍक्टरेस होती. 1988 मध्ये मिस इंडियाचा ‘किताब आपल्या नावे करणारी शिखांच्या सौंदर्याचे अनेक चाहते होते. शिखाने रामायणात देखील भूमिका केली होती. शिखा सोशल मीडियावर जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह नाही परंतु तिचे चाहते त्यांचे फोटो आजही शेअर करताना दिसतात.

अरुण गोविल – रामायण
टीव्हीवरील मालिकांविषयी ज्यावेळी बोलले जाते त्यावेळी रामायणाचे नाव नक्की निघते मग सर्वांना अरुण गोविल यांनी साकारलेले राम आठवतात. याव्यतिरिक्त त्यांनी इतनी सी बात’ ‘श्रद्धांजलि’ ‘जियो तो ऐसे जियो’ ‘सावन को आने दो’ अशा मालिकांमध्ये देखील काम केले. परंतु रामाची भूमिका करणाऱ्या या अभिनेत्याने आता स्वतःला अभिनयापासून दूर ठेवले आहे.

महाभारत – गजेंद्र चौहान
गजेंद्र चौहान यांनी महाभारतात धर्मराज युधिष्टिरची भूमिका केली होती. या पात्रात त्यांच्यावर इतका परिणाम केला होता की ते स्वतःला विसरले होते असे मत गजेंद्र चौहान यांनी एका मुलाखतीदरम्यान व्यक्त केले होते. त्यांनी एक मजेशीर किस्सा देखील सांगितलं होता एक महिला त्यांच्याकडे येऊन म्हणाली होती की, तुमची हिम्मत कशी झाली द्रौपदीला दावावर लावण्याची. गजेंद्र चौहान हे एफटीआयचे चेअरमॅन देखील राहिलेले आहेत.

कहानी घर-घर की – श्वेता कावत्रा
श्वेताला तुम्ही काहींनी घर घर की मध्ये पाहिलेले आहे. त्यामध्ये श्वेताने पल्लवी नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून श्वेता कोठे हरवली आहे हे कोणालाच माहित नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/