कोळी समाज मेळाव्यात ९१ विवाहोच्छुकांनी दिला परिचय

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – अखिल भारतीय कोळी समाज शाखा धुळे व नंदुरबार जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने सातवा वधु-वर पालक परिचय मेळावा दोंडाईचा येथील सहकार महर्षि दादासाहेब रावल नगर संकुलात कोळी समाजाचे राज्य अध्यक्ष तथा ठाण्याचे माजी आ.कांतीजी कोळी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. उद्घाटन अखिल भारतीय कोळी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खा. सत्यनारायण पवार यांच्या हस्ते झाले. मेळाव्यात विवाहोच्छूक ९९ तरुण-तरुणींनी परिचय करुन दिला.

कार्यक्रमात सत्यनारायण पवार म्हणाले, सर्व समाज संघटनांनी संघटीत होऊन आमदार व खासदार निवडून दिल्यास बिनबोभाटपणाने अनु.जमातीच्या सवलती मिळतील, समाज राजकीय, सामाजिकदृष्ट्या संघटीत असल्यामुळेच कोळी समाजाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती पद मिळाले व सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष कुवरजी बावलीया यांना गुजरात राज्याचे मंत्रीपद मिळाले आहे.

यावेळी शिरपूर पं.स.चे माजी उपसभापती पी.एस. अंतुर्लीकर, पुणे मनपाचे अति.आयुक्त प्रवीण देवरे, रेल्वे विभागातील अभियंता सत्येंद्र कुवर, डॉ.सुशिलकुमार नवसारे धुळे, खेतीयाचे नगराध्यक्ष अरविंद बागूल, गोविंदराव जाधव, जळगाव कारागृह अधीक्षक भानुदास श्रीराव, कार्यकारी अभियंता लिलाधर शिंदे, शरद सोनवणे सिंधुदुर्ग, डॉ.राजेश कोळी नंदुरबार, आरोग्य विभाग संचालक डॉ.रविकिरण चव्हाण, जि.प.चे माजी उपाध्यक्ष भारत ईशी, वसंत भोलाणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती इशेंद्र ईशी, जळगाव जिल्हाध्यक्ष दिनेश प्रभाकर सोनवणे, इगतपुरी गटविकास अधिकारी भरत वेंदे, विलास चव्हाण दोंडाईचा, नारायण बागुल खेडदीगर, डोंगर नवसारे, डी.एस.बागुल, संतोष सदाराव, शिंदखेडा प.ंस. सदस्य शानाभाऊ सोनवणे, भिला शिरसाठ, एस.एस. चित्ते, वसंत कोळी, अमृत बागुल, आर.ए.कोळी, प्रवीण साळवे, किशोर बागुल, नामदेव अहिरे, संदीप सोनवणे, भूपेंद्र जाधव, ॲड.बळीराम वाघ, अकोला क्रीडाधिकारी आसाराम जाधव, तुकाराम जाधव, बाबुराव शिरसाठ, डॉ.गणेश शिरसाठ, किशोर सोनवणे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रदीप नवसारे, मनोज निकम यांनी केले तर सुत्रसंचलन जिल्हा सरचिटणीस रमेश निकम यांनी मानले. कैलास ईशी यांनी आभार व्यक्त केले.