थेरगावातील एकाची ९१ हजारांची फसवणूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – विमा कंपनीतून बोलत असल्याचे भासवून, विम्याचा हप्ता कमी करण्याचे अमिष दाखवत एकाची ९१ हजार ६३१ रुपयांची फसवणूक केली.

या प्रकरणी माल्याद्री मालाकोंडाय्या पल्लाला (४५, रा. गणेशनगर, थेरगाव) यांनी फिर्याद दिली. तर मनीषकुमार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माल्याद्री यांची एका विमा कंपनीत पॉलिसी आहे. मनीषकुमार याने माल्याद्री यांच्याशी संपर्क साधला. आपण संबंधित विमा कंपनीमधून बोलत असल्याचे त्याने भासवले. तुम्ही पॉलिसीची रक्कम २३ डिसेंबर पूर्वी भरली तर त्यांना ठराविक रकमेची सूट मिळणार असल्याचे आमिष दाखवले.  यासाठी त्याने स्वतःच्या बँक खात्यावर ९१ हजार रुपये भरण्यास सांगितले आणि त्यांची फसवणूक केली. तपास वाकड पोलीस करत आहेत.