काँग्रेसकडून नवीन फॉर्म्युला : ‘वंचित’ ला दिली 96 जागांची ‘ऑफर’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत ज्या वंचित बहुजन आघाडीमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला त्यांना देखील सोबत घेण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरु केल्याचे दिसून येत आहे. यासाठी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला ९६ जागांची ऑफर दिली असून यावर वंचित काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने नवीन फॉर्म्युला तयार केला असून काँग्रेस ९६, राष्ट्रवादी काँग्रेस ९६ आणि वंचित बहुजन आघाडीने ९६ जागांवर निवडणूक लढवावी  अशी ऑफर त्यांनी वंचितसह राष्ट्रवादी काँग्रेसला दिली आहे. मात्र हि ऑफर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी धुडकावून लावल्याचे समोर येत आहे. या निवडणुकीत आघाडी व्हावी यासाठी काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र वंचित यासाठी तयार नसल्याचे चित्र सध्या दिसत असून याविषयी लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांच्या मित्रपक्षांना त्यांच्या कोट्यातल्या जागा द्यावी अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मंडळी आहे.

जागा खेचण्याचे प्रयत्न 
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आतापर्यंत अनेक आमदार पक्ष सोडून गेले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपर्यंत किती आमदार पक्ष सोडून जातात यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे गणित अवलंबून असल्यामुळे प्रकाश आंबेडकर जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –