राज्यातील 96 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना (Sr. PI) सहाय्यक आयुक्त (ACP)/ पोलीस उप अधीक्षक (DySp) पदी पदोन्नती ! पुण्यातील वायकर, कुरूंदकर, वाखारे, पाटील, तांबे, देशमुख आणि गवारेंचा समावेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य पोलिस दलातील तब्बल 96 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना आज गृह विभागाकडून सहाय्यक पोलिस आयुक्त / पोलिस उप अधीक्षक पदावर बढती देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बढत्या रखडल्या होत्या. अखेर आज तब्बल 96 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली असून त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

पुणे, पिंपरी आणि पुणे ग्रामीण पोलिस दलातील बढती मिळालेल्या अधिकार्‍यांच्या नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे हे पुढील प्रमाणे –

1. श्रीकांत सदाशिव क्षिरसागर (टी.आर.टी.आय, पुणे ते उपविभागीय अधिकारी, पुणे रेल्वे उपविभाग, पुणे)
2. अरूण शिवाजी वायकर (पुणे शहर ते उपविभागीय अधिकारी, साकोली उपविभाग, भंडारा)
3. संजय शामसुंदर कुरूंदकर (पुणे शहर ते सहाय्यक आयुक्त, मुंबई शहर)
4. शशिकांत पांडूरंग वाखारे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा ते उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अमरावती)
5. राजेंद्र गणपती पाटील (पुणे शहर ते उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग (गुन्हे) म्हणजे सीआयडी, पुणे)
6. विवेकानंद तुकाराम वाखारे (पुणे शहर ते उपविभागीय अधिकारी, हिंगोली ग्रामीण)
7. महेश सुर्यकांत थिटे (एम.आय.ए. पुणे ते उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग (गुन्हे) म्हणजेच सीआयडी, पुणे)
8. विवेक एकनाथ लावंड (पिंपरी चिंचवड ते उपविभागीय अधिकारी, मुक्ताईनगर, जळगाव)
9. जितेंद्र ज्ञानेश जगदाळे (पोलिस प्रशिक्षण केंद्र खंडाळा ते उपविभागीय अधिकारी, लातूर शहर)
10. सुनिल जयसिंग तांबे (पुणे शहर ते उप अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, औरंगाबाद)
11. राजेंद्र दत्ताजीराव देशमुख (पुणे शहर ते उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग (गुन्हे) म्हणजेच सीआयडी, पुणे)
12. राजकुमार शंकर शिंदे (पिंपरी चिंचवड ते उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, धुळे)
13. सयाजी आनंदराव गवारे (पुणे शहर ते उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग (गुन्हे) म्हणजेच सीआयडी, पुणे)
14. प्रकाश गणपतराव धस (पिंपरी चिंचवड ते उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग (गुन्हे) म्हणजेच सीआयडी, पुणे)

पुणे ग्रामीण

1. अमृत वसंतराव देशमुख (तासगांव ते उप अधीक्षक, मुख्यालय, पुणे ग्रामीण)