गृह मंत्रालयानं ‘ब्लॅकलिस्ट’ केलेल्या 960 ‘तबलिगी’ जमातींपैकी 379 ‘इन्डोनेशिया’ तर 110 जण ‘बांगलादेशी’

नवी दिल्ली: वृत्तसंस्था – देशात कोरोनाने कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त व्यक्तींच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच ‘तबलिगी जमात’च्या मेळाव्याला दिल्लीतील निजामुद्दीन येथे अनेकांनी हजेरी लावली आणि यातील बरेच लोक कोरोना पॉझिटिव्ह असून ते देशभर पसरले आहेत. या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ माजली आहे. अशा लोकांना देशभर शोधून काढण्याचे आणि त्यांच्यावर उपचार करण्याचे तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम देखील युद्ध पातळीवर सुरु आहे. या लोकांमध्ये देश तसेच विदेशातील लोकांचा देखील समावेश आहे.

ब्लॅकलिस्टेड आणि व्हिसा रद्द करण्यात आलेल्यांचा समावेश

वृत्तसंस्था पी. टी.आय ने याबाबत आता आणखी माहिती प्रसिद्ध केली आहे. एका आधिकाऱ्याने दिलेल्या या माहितीनुसार , ९६० विदेशी ‘तबलीघी जमात’च्या कर्यकर्त्यांमध्ये ३७९ इंडोनेशियन, ११० बांग्लादेशी तबलीघिंचा समावेश आहे. या सगळ्यात महत्वपूर्ण आणि धक्कादायक बाब म्हणजे यातील काहीजण ब्लॅकलिस्टेड आहेत तर काहींचा व्हिजा रद्द करण्यात आला आहे.

एका आधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅकलिस्टेड आणि व्हिसा रद्द करण्यात आलेल्या तबलीघी जमात कार्यकर्त्यांमध्ये 9 ब्रिटिश, 4 अमेरिकन, 6 चिनी, 3 फ्रेंच नागरिकांचा समावेश आहे.

तबलीगी जमातमधील 9000 लोक क्‍वारंटाइन मध्ये ठेवण्यात आले

दरम्यान गुरुवारी गृह मंत्रालयाचे सहसचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी सांगितले की , गृह मंत्रालयाने 9000 तबलिगी जमात कार्यकर्ते आणि त्यांचे संपर्क ओळखले आणि त्यांना अलग ठेवण्यात आले. या 9000 लोकांपैकी 1306 विदेशी आणि बाकीचे भारतीय आहेत.