काय सांगता ! होय, ‘या’ शहरात 97 वर्षाची महिला निवडणुकीच्या मैदानात, स्वतः करतेय ‘प्रचार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या देशामध्ये कोणत्या ना कोणत्या भागात सतत निवडणुका होत असतात, राजस्थानच्या सीकर या ठिकाणी सुरु असलेल्या निवडणुकीमध्ये एक वेगळी गोष्ट पाहायला मिळाली. येथे सुरु असलेल्या निवडणुकांमध्ये थेट 97 वर्षीय महिलेने निवडुकीच्या रिंगणात पाऊल ठेवले आहे.

97 वर्षीय वृद्ध महिला विद्या देवी या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या आहेत आणि संपूर्ण निवडणुकीमध्ये केवळ त्यांचीच चर्चा आहे. विशेष म्हणजे एवढ्या वृद्ध असूनदेखील विद्या देवी हे प्रचार स्वतः करत आहेत. त्याचे पती मेजर शिवराम सिंह हे देखील 55 वर्षांपूर्वी सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आलेले होते. विद्या देवीचे सासरे सुभेदार सेडूराम हे वीस वर्षे गावचे सरपंचही होते. सर्वसाधारण महिला राखीव जागा असल्याने आता विद्या देवी याच सीटवरुन नशीब आजमावत आहेत.

त्यांचा नातू मोंटू सीकरमध्येच प्रभाग क्रमांक 25 मधील जिल्हा परिषद सदस्य आहे. विद्या देवी या राजस्थामधील एकमेव महिला असतील ज्या या वयामध्ये देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत.

एवढेच नाही तर विद्या देवी या स्वतः गावामध्ये जाऊन मत मागत आहेत. त्यांचा सामना याच परिसरातील विद्यमान सरपंच सुमन देवी यांच्याशी आहे.त्यासोबतच विद्यादेवी यांच्याव्यतिरिक्त अन्य तीन महिला उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. यांची नावे झनकोरी देवी, विमला देवी आणि आरती मीणा असे आहे.

गावाच्या विकासामध्ये सासऱ्यांनी आणि पतीने खूप मोठे योगदान दिलेले आहे त्यामुळे निवडणूक लढवून तीच परंपरा पुढे चालू ठेवणार असल्याचे विद्या देवी यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/