US : शाळा सुरु करणे पडले महागात, 2 आठवड्यात 97 हजार विद्यार्थी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोरोना महामारिमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत आहे. मार्चपासून उद्भवलेल्या या महामारीमुळे सरकारी आणि खासगी शाळा बंद आहेत. कोरोना लॉकडाऊनमुळे जवळपास सहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत. लॉकडाऊनमध्ये हळूहळू शिथील केला जात आहे. अशातच शाळाही सुरु करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे.
भारतामध्ये मागील काही दिवसांपासून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय अनेक शाळांनी स्वीकारला आहे. मात्र ही व्यवस्था शहरांमधील मोठ्या शाळांपुरती मर्यादित आहे. बऱ्याच ग्रामीण भागात सर्वत्र इंटरनेट उपलब्ध नसल्याने शालेय शिक्षण रखडले आहे. त्यामुळे भारतात शाळा सुरु करण्याचा विचार सुरु आहे. तर अमेरिकेत काही शाळा सुरु झाल्या आहेत. त्याआधीच झालेल्या सर्वेक्षणात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
एका रिपोर्टनुसार, शाळा सुरु होण्याआधीच फक्त 2 आठवड्यात 97 हजार विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अमेरिकेत एकूण 3 लाख 38 हजार मुलांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यापैकी जुलैच्या शेवटच्या दोन आठवड्यातच 97 मुलांना कोरोना झाला आहे. अमेरिकेच्या अकॅडमी ऑफ पीडियास्ट्रिक्सने 16 जुलै ते 30 जुलै या कालाधीत या आकडेवारीचा रिपोर्ट जारी केला आहे. यापूर्वी इज्राइललाही शाळा सुरु करण्याचा निर्णय महागात पडला आहे. या देशाने शाळा सुरु केल्यानंतर 261 जणांना कोरोना झाला. त्यामुळे 6800 मुलांना क्वारंटाईन करण्यात आले.