Coronavirus : चिंताजनक ! ‘कोरोना’मुळे पुण्यात 24 तासात 7 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलान – राज्यात कोरोना बाधीतांचा आकडा वाढत असून पुणे आणि मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात मागील 24 तासात 99 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहे. तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात दिवसभरात 52 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यात 79 गंभीर रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु असून 18 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

पुण्यात एकूण पॉझिटिव्हि रुग्णांची संख्या 2042 आहे. यामध्ये डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये आणि खासगी हॉस्पिटलमध्ये 1767 रुग्ण असून ससून रुग्णालयात 262 रुग्ण दाखल आहेत. पुण्यातील अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 1324 असून पुण्यातील मृतांची संख्या 118 झाली आहे.

दरम्यान, आज पुणे विभागात 673 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 574 वर पोहचली आहे. तर अ‍ॅक्टिव रुग्ण 1764 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकूण 137 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 93 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात 2300 कोरोनाबाधित रुग्ण असून 608 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अ‍ॅक्टिव रुग्ण 1555 असून करोनामुळे 124 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 86 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली असल्याचेही, दीपक म्हैसकर यांनी सांगितले.