काश्मीर बद्दल मलालाचं मोठं विधान ! शूटर हिना सिध्द म्हणाली – ‘पहिलं पाकिस्तानात जाऊन तर दाखव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमधील सामाजिक कार्यकर्ती युसुफजई मलाला हिने काश्मीर प्रश्नावर केलेल्या ट्विटमुळे सध्या ती मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहे. तिने केलेल्या ट्विटननंतर तिचा सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेण्यात येत आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते कि, काश्मीरमधील मुली शाळेला जाऊ शकत नाहीत यामुळे आपण निराश आहोत. त्याचबरोबर काश्मीरमधील परिस्थितीमुळे तुन मुली परीक्षेला मुकल्याचे देखील तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तिच्या या ट्विटननंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली असून भारताची नेमबाजपटू हिना सिद्धू हिने तिच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे. तिने मलाला हिला सुनावताना म्हटले कि, तुला याच काय करायचं आहे, तू पहिल्यांदा पाकिस्तानमध्ये जाऊन दाखव, स्वतःच्या देशातून पळून गेल्यानंतर तू अजून तुझ्या देशात परत गेलेली नाहीस.

त्याचबरोबर हिना सिद्धू हिने पाकिस्तानमधील शाळेवर झालेल्या हल्ल्याची देखल यावेळी आठवण करून दिली. त्यामुळे मलालाने शिकण्यासाठी पहिल्यांदा पाकिस्तानला जाऊन दाखवावे, असा टोलादेखील तिने हाणला. कर्नाटकच्या खासदार शोभा करंदालजे यांनी देखील मलाला हिच्या ट्विटवर उत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले कि, मलाला हिला माझी विंनती आहे कि, तिने पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांचा देखील विचार करावा. त्यांना काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मलाला हिने काश्मीरविषयी कोणतेही भाष्य करू नये.

दरम्यान, मलालानं काश्मीरमध्ये शाळा सुरु करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाकडे विनंती केली होती. त्यावेळी देखील अनेक काश्मिरींनी नाराजी व्यक्त केल्याचे म्हटले होते.