Former MP Amar Sable | अंधाऱ्या काळोखात पांढऱ्या प्रकाशाची रेघ ओढावी, त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या जीवनात महाडचा सत्याग्रह करून प्रकाशाची वात पेटवली – माजी खासदार अमर साबळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Former MP Amar Sable | विवेक विचार मंच व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU Pune) मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, 20 मार्च महाड चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘महाड सत्याग्रह (Mahad Satyagraha) आणि सामाजिक समतेचा लढा’ विषयावर माजी खासदार अमर साबळे (Former MP Amar Sable) बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण करून आणि संविधानाची उद्देशिका वाचून करण्यात आली. मराठी विभागाच्या वतीने प्रा.डॉ.प्रभाकर देसाई सरांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. तसेच विवेक विचार मंचच्या वतीने डॉ. कुंडलिक पारधी यांनी विवेक विचार मंचबद्दल थोडक्यात माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माजी खासदार अमर साबळे  यांनी महाड सत्याग्रह आणि सामाजिक समतेची लढा याचा संपूर्ण इतिहास मांडला. या सत्याग्रहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना इतर जातीधर्माच्या लोंकानी व स्वांतत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी कसा पाठिंबा दिला तेही सांगितले. आपण हा दिवस प्रेरणा दिवस, अहिंसा व शांततेचे प्रतीक म्हणून कसा साजरा करू शकतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा वापर करून कसा खोटा इतिहास पसरवला जातो. अशा लोंकापासुन समाजाने सावध राहिले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मानवतावादी, अहिंसावादी आणि भारतीय संस्कृतीचे पुरस्कर्ते होते, असे अमर साबळे यांनी सांगितले.

यावेळी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या बागेश्री मंठाळकर, प्रा.डॉ.प्रभाकर देसाई
आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुधाकर अहिरे यांनी केले.
अनिल खिरडकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Web Title :  Former MP Amar Sable Babasaheb Ambedkar lit the
wick of light by performing Satyagraha of Mahad in the life of the
untouchables, just as a line of white light should be drawn in the darkness – Former MP Amar Sable

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

CSK Team Update | IPL सुरु होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू टीममधून बाहेर

Chandrakant Patil | तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाची मान्यता -चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil | पानशेत पुरग्रस्त पुनर्वसित सहकारी सोसायटींच्या भाडेपट्टा जमिनीसंदर्भात राज्यशासन सकारात्मक – चंद्रकांत पाटील

Eknath Khadse | ‘सध्या विरोधकांना शत्रूसारखं वागवलं जातं’, एकनाथ खडसेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल