6 महिन्याच्या बालकाच्या पोटातून निघाले 1 महिन्याचे निरोगी बाळ, 5 लाख लोकांमध्ये 1 मध्ये होते असे

पाटणा : ही बातमी बिहारमधून आली आहे, येथे एका 6 महिन्याच्या बालकाच्या पोटातून एक अवांछित भ्रूण सापडले आहे. हे प्रकरण बिहारच्या पाटणामधील आहे, जिथे पाटणा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये एका 6 महिन्याच्या बाळाच्या पोटातून डॉक्टरांनी यशस्वी सर्जरी केल्यानंतर त्याच्या पोटातून एक छोटे भ्रूण काढले. बालकाच्या पोटातील हे भ्रूण सव्वा किलाग्रॅमचे आहे. डॉक्टरांनी ऑपरेशन नंतर हे भ्रूण काढून त्यास नवीन जीवन दिले.

डॉ. अमरेंद्र कुमार यांनी सांगितले की, सुमारे साडेसहा महिन्याच्या वयाच्या बालकाच्या पोटात एक किलो 250 ग्रॅमचे भ्रूण होते. बालरोग विभागाच्या टीमने तपासणीनंतर नवजात बालकाचे यशस्वी ऑपरेशन करून भ्रूण काढले. इतकेच नव्हे, बालकाच्या पोटातील भ्रूण वेळेसोबत मोठे सुद्धा होत होते. बालक जेव्हा दोन महिन्याचे होते, तेव्हापासून त्याला पोट फुगण्याची समस्या होऊ लागली होती.

त्यांनी म्हटले की, बक्सरच्या डॉक्टरांनी इरफानच्या पोटात ट्यूमर असल्याचे सांगून पीएमसीएच रेफर केले होते.

विभागाचे प्रमुख डॉ. अमरेंद्र कुमार यांचे म्हणणे आहे की, सुमारे पाच लाख मुलांमध्ये एकाच्या बाबतीत असे प्रकरण आढळते. त्यांनी म्हटले की, सामान्यपणे अशा प्रकरणात भ्रूण जास्त विकसित होऊ शकत नाही, परंतु या भ्रूणात हात, पाय, पोट आणि अंगसुद्धा तयार झाले होते. डॉ. कुमार यांनी सांगितले की, एकदा त्यांच्या विद्यार्थी दशेत असे प्रकरण समोर आले होते आणि त्यानंतर आता हे आश्चर्य पहायला मिळाले आहे. त्यांनी म्हटले की, भ्रूण सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

हॉस्पिटलमध्ये सर्वांनी डॉक्टरांचे सर्वांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा व्यक्त केली की, या बाळाला वाचवता यावे. डॉक्टर बाळाला वाचवण्याचे पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. डॉक्टरांनी हे देखील सांगितले की, बाळाला 48 तासांपर्यंत अजूनही कडेकोट देखरेखीत ठेवले जाईल. त्यानंतरच याबाबत काहीतरी सांगता येईल. हॉस्पिटलच्या बाहेर ही बातमी पसरल्यानंतर लोकांनी ते भ्रूण पाहण्यासाठी गर्दी केली होती.