महाशिवरात्र यात्रेत नराधमानं मुलीला छेडलं, नागरिकांनी बेदम चोपलं

वसई : पोलीसनामा ऑनलाइन – आज संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने आनंदाचे वातावरण असतानाच वसईमध्ये एका नराधमाने एका १० वर्षीय मुलीची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. वसईतील तुंगारेश्वर मंदिरात ही घटना घडली असून, झालेल्या प्रकारानंतर तेथील नागरिकांनी त्या आरोपीला बेदम चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले .

सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून १० वर्षीय मुलीची छेड काढल्यामुळे तेथील भाविकांनी त्या आरोपीला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. गेल्या काही दिवसांत महिलांवरील अत्याचारांची संख्या वाढलेली आहे. कोणत्याही ठिकाणी महिला सुरक्षित नसल्याचे आता बोलले जात आहे. मंदिरासारख्या श्रद्धेच्या ठिकाणी सुद्धा ,महिला सुरक्षित नसतील तर, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उभा राहिला आहे.

आज संपूर्ण देशात महाशिवरात्रीचा उत्साह आहे तर, अनेक मंदिरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे, त्यामुळे कोणत्याही ठिकाणी महिलांची छेडखानी , चोऱ्यामाऱ्या आणि चेंगराचेंगरी होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

You might also like