मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या राजीनामा देणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे, तांत्रिक बाब म्हणून फडणवीस आपला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील. कारण 8 नोव्हेंबरला 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे फडणवीसांचा राजीनामा अपेक्षितच आहे. उद्या रात्री 12 वाजेपर्यंत ते राजीनामा देतील.

उद्या म्हणजेच 8 नोव्हेंबरला 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपेल आणि नवं सरकार स्थापन होईल. परंतू राज्यात सत्ता स्थापनेवरुन भाजप शिवसेनेत पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आता काही तासच शिल्लक राहिले आहेत. मुख्यमंत्री राज्यपालांकडे राजीनामा सोपवतील. त्यानंतर संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होईल. त्यामुळे उद्याचा दिवस महत्वाचा आहे.

परंतू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्यांना राजीनामा देण्याची गरज नसते. 8 तारखेला मुख्यमंत्री राजीनामा देतील तेव्हा सर्व मंत्रीमंडळ बरखास्त होईल आणि सर्वच मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जाईल.

देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यपालकडून त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमले जाऊ शकते. परंतू फडणवीस हे कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाहीत. म्हणूनच राज्यपालांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

असे असताना भाजपकडे फोडाफोडीचे राजकारण सुरु असल्याची टीका विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसने देखील आपल्या आमदारांना मुंबई बोलावून घेतले आहे. फोडाफोडीच्या राजकारणामुळे काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आहे.

भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपले आमदार सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी मुंबईत बोलावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

तर जोपर्यंत सरकार स्थापन होणार नाही तोपर्यंत शिवसेना आपल्या आमदारांना मुंबईत ‘रंगशारदा हॉटेल’मध्ये थांबण्याचे आदेश दिले आहेत. तर मुंबईतील आमदारांना इतरत्र हलवण्यात आले आहेत. भाजप सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आमदारांशी संपर्क साधत असल्याचा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. त्यामुळे काँग्रेसने देखील आपल्या आमदारांना बोलावून घेतले आहे. पुढील 24 तास राज्यातील राजकीय परिस्थिती महत्वाचे असणार आहेत.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके