संतापजनक ! दोन भावांनी सख्ख्या बहिणीवरच केला बलात्कार

लखनऊ : वृत्तसंस्था – 12 वीत शिकणाऱ्या तरुणीवर तिच्याच दोन सख्ख्या भावांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील ही घटना आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये  गेली 4 वर्षे तिचे दोन्ही भाऊ तिच्यावर बलात्कार करत होते. सदर प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर दोन्ही भावांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. धर्मेश आणि प्रशांत अशी या भावांची नावे आहेत. सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सर्वांकडून संताप व्यक्त केला जात आहे. भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी अशी ही घटना आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a9592e6f-d2ce-11e8-b9b6-dbf513395444′]
पीडित मुलगी ही तिच्या  मेरठच्या सिव्हिल लाईन परिसरातील पांडवनगरमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होती. धर्मेश आणि प्रशांत दोन्ही सख्खे भाऊ गेल्या 4 वर्षांपासून सातत्याने तिच्यावर बलात्कार करत होते. तसेच तिला धमकावलंही जायचं की, याबाबत कोणाला काही सांगितले तर आईला जीवे मारु. इतकच नाही तर तिने कोणत्याही प्रकारे विरोध दर्शवला तर तिला जबर मारहाणही त्या दोघांकडून केली जायची. एक दिवस पीडितेने हिंमत दाखवली आणि सर्वोदय या स्वयंसेवी संस्थेकडे मदत मागितली. त्यानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकाऱ्यामुळे तिने पोलिस स्थानक गाठलं आणि भावांविरोधात तक्रार केली.
पोलीस अधिक्षक रणविजयसिंह यांनी माहिती दिली की, पीडित तरुणीने केलेल्या तक्रारीच्या आधारावर घटनेची चौकशी सुरू आहे. आम्ही दोन्ही भावांना ताब्यात घेतलं असून त्यांनी आपला गुन्हा कबुल केला आहे. आम्ही या प्रकरणाचा अधिक तपास करत आहोत.