‘सिम्बायोसिस’मध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय तरुणीची हॉस्टेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विमाननगर परिसरातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणीने हॉस्टेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रॅक्टिकल परीक्षा होती, त्यात तिचे प्रॅक्टिकल राहिले होते. त्यामुळे ती नैराश्यात असल्याचे सांगण्यात आले.

समिधा कालिदास राऊत (वय 20, रा. सिम्बायोसिस हॉस्टेल, मूळ. गडचिरोली ) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुविधा ही मूळची गडचिरोली जिल्ह्यातील होती. गेल्या दोन वर्षांपासून ती शिक्षणासाठी पुण्यात राहत होती. ती सिम्बायोसिस येथे पत्रकारितेच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. दरम्यान कोरोना आजारामुळे सध्या महाविद्यालयाना सुट्या आहेत. तिच्या मैत्रिणी देखील आपआपल्या गावी गेल्या आहेत.

मात्र प्रॅक्टिकलची परीक्षा होती. तिचे प्रॅक्टिकल राहिले होते. त्यामुळे ती हॉस्टेलाच राहत होती. तिच्या सोबत आणखी तीन मैत्रिणी देखील राहत होत्या. दरम्यान सुमधा हिचे प्रॅक्टिकल अपूर्ण होते. त्यामुळे ती नैराश्यात होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. 1 एप्रिल रोजी रात्री तिच्या मैत्रिणी आणि त्या अभ्यास करत होत्या. रात्री ती रूमवर जाते म्हणून गेली. पण यानंतर ती परत आली नाही. यामुळे मैत्रिणी तिच्या रूमवर गेल्या. त्यावेळी तिने दार उघडले नाही. त्यावेळी त्यांनी खिडकीतून पाहिले असता तिने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी नोंद करण्यात आली असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.