ल्युडो खेळताना वडिलांनी फसवले, तरुणीची कोर्टात धाव

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाउनमध्ये अनेकांच्या पसंतीस उतरलेल्या ल्युडो खेळाने कुटूंबात भांडणे लावण्यास सुरुवात केली आहे. ल्युडो हा खेळ खेळताना वडिलांनी मला फसवले आहे. ल्युडो खेळताना माझी फसवणूक करतील अशी अपेक्षा नव्हती असा आरोप करत एका 24 वर्षीय तरुणीने फॅमिली कोर्टात धाव घेतली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ या ठिकाणी ही घटना घडली आहे.

संबंधित तरुणीने माझे वडील मला ल्युडोमध्ये फसवतील असे मुळीच वाटले नव्हते. मात्र त्यांनी खेळ खेळताना मला फसवले म्हणून मी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे असे तिने सांगितले आहे. या मुलीला समुपदेशनाची गरज असून समुपदेशनासाठी आम्ही चार सेशन्स आयोजित केली आहेत असे कोर्टातल्या समुपदेशक सरिता यांनी सांगितले आहे . दरम्यान, एप्रिल महिन्यात या सारखीच एक घटना उत्तर प्रदेशात घडली होती. फरुखाबाद येथील महिलेने तिच्या पतीविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. ल्युडो खेळतना पतीने आपल्याला फसवले असा आरोप तिने केला होता. त्यानंतर आता मध्यप्रदेशातली घटना समोर आली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like