Coronavirus : पुण्यातील ससून रूग्णालयातील नर्सला ‘कोरोना’ची लागण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं पुण्यात चांगलच थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ससून रूग्णालयातील एका नर्सला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तिची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून तिला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्याची माहिती ससूनचे डीन डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली आहे.


शहरातील एका नामांकित रूग्णालयात मुख्य परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याचे यापुर्वीच स्पष्ट झाले आहे. आता ससून रूग्णालयातीलच नर्सला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोबाधित नर्सला आयसोलशेन वॉर्डमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती ससूनच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे.