Corona | तब्बल 100 दिवस ‘तिने’ केला कोरोनाशी ‘संघर्ष’; 45 वर्षांची महिला कोरोनावर मात करुन परतली घरी

मेरठ : कोरोनाची (Corona) दुसरी लाट या वर्षीच्या एप्रिलमध्ये देशभरात अचानकपणे पसरली. त्यात हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. काहींना ऑक्सिजनच्या कमतरतेने हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागला. कोरोनाची दुसरी लाट (corona second wave) उच्चस्तरात असताना कोवीड पॉझिटिव्ह झालेल्या आणि ऑक्सिजन सपोर्टची गरज भासलेली एक 45 वर्षांची महिला तब्बल 100 दिवसांच्या उपचारानंतर आता बरी होऊन घरी परतली आहे.

ही महिला मेरठच्या लाला लाजपत राय मेमोरियलमध्ये गेली 100 दिवस उपचार घेत होती. शुक्रवारी
तिला घरी सोडण्यात आली. देशात कोरोनाची दुसरी लाट आली. त्यात या महिलेला कोरोनाचा संसर्ग
झाला होता. तिला २१ एप्रिल रोजी लाला लाजपत राय मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात
आले. त्यावेळी तिची प्रकृती खुप खालावली होती. तिला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. काही
महिने तिला ऑक्सिजनची गरज भासली. आता त्यातून ती पूर्णपणे बरी झाली असून ३० जुलै रोजी तिला हॉस्पिटलमधून डिचार्ज देण्यात आला असल्याचे लाला लाजपत राय मेमोरियलच्या डॉक्टरांनी सांगितले. तब्बल 100 दिवस कोरोनाशी झुंज देऊन घरी परतणारी ही बहुदा देशातील पहिलीच महिला असावी.

हे देखील वाचा

MPSC ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निर्देशानंतर 2 दिवसात शासनाकडून निर्णय

NIA कडून काश्मीरमध्ये 15 ठिकाणी छापे, एका दहशतवाद्याला अटक

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Titel :  Corona | A 45-year-old woman, who was admitted to Lala Lajpat Rai Memorial Medical College for COVID treatment, was discharged after 100 days