पोलीसनामा ऑनलाईन टीम – पावसामुळे नागपूरमध्ये इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. आज पहाटे ही घटना घडली आहे. त्यामध्ये एकजण ठार झाला असून अग्निशमन विभागाचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. किशोर टेकसुल्तान असे ठार झालेल्याचे नाव आहे.
नागपूरच्या सदर भागात आज पहाटेच्या सुमारास 50 वर्ष जुनी इमारत कोसळली. रहिवासी इमारत असल्यामुळे यामध्ये चार जण अडकले असून चाक जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. अग्निशमन विभागाने चार जणांना बाहेर काढले आहे. अपघाताचे काही व्हिडिओदेखील व्हायरल झाले आहेत. पावसाळ्याआधी अनेक जुन्हा इमारतींचे ऑडिट केले नाही. त्यामुळे अशा इमारती कोसळण्याच्या घटना घडत असल्याचे बोलले जात आहे.