OMG : ड्रायव्हिंग लायसन्सच्या चाचणीत 192 वेळा नापास होऊन केला रेकॉर्ड, 2 दशकांपासून देत आहे परीक्षा

पोलिसनामा ऑनलाईन – जेव्हा जेव्हा आपण रस्त्यावर कोणतेही वाहन चालवतो तेव्हा सरकारी नियमांनुसार आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. जरी आपल्याला कार अथवा दुचाकी कशी चालवायची हे माहित असेल तरीही डीएल असणे आवश्यक आहे. डीएल तयार करण्यासाठी प्रत्येकाला चाचणी द्यावी लागते. आपल्या देशात बऱ्याच वेळा लोक चाचणीशिवाय एजंटमार्फत परवाना घेतात, परंतू इतर देशांमध्ये ते शक्य नाही, म्हणून तिथे तुम्हाला प्रॅक्टिकल टेस्ट उत्तीर्ण झाल्यावरच लायसन्स मिळतो. जर एखादी व्यक्ती ड्रायव्हिंग टेस्टमध्ये १ ते १० वेळा फेल झाली असेल तर आपण समजू शकतो, परंतू तुम्ही कधी ऐकले आहे का की एखादी व्यक्ती १०० पेक्षा अधिक वेळा ड्रायव्हिंग टेस्टमध्ये नापास होऊ शकतो? हे ऐकून तुम्हाला विश्वास बसला नसेल ना, परंतू ही गोष्ट खरी आहे.

१७ वर्षांपासून कार चालवणे शिकत आहे
पोलंडमध्ये असणाऱ्या एका व्यक्तीने ड्रायव्हिंग लायसन्ससाठी खूप त्रास झेलला. या व्यक्तीने ड्रायव्हिंग चाचणी एक, दोन अथवा दहा वेळा नव्हे तर चक्क १९२ वेळा दिली. परंतू त्याने हार मानली नाही आणि वारंवार अपयशी ठरल्यानंतरही ते एकामागून एक चाचणी देत आहेत. ही व्यक्ती गेली १७ वर्षे सातत्याने कार ड्रायव्हिंग शिकत आहे आणि आता त्याने १९२ वी चाचणी देऊन नापास झाल्याची नोंद केली आहे.

पोलंडमध्ये प्रॅक्टिकल चाचणीत पास होणे आवश्यक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे दोन दशकांपासून कार चालवण्याचे प्रशिक्षण घेत असलेल्या या व्यक्तीने आतापर्यंत वाहन चालवताना लाखो रुपयांहून अधिक रुपयांचा अपव्यय केला आहे. पोलंडमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी प्रयेक व्यक्तीला चाचणी उत्तीर्ण करावीच लागते. ज्यात एक प्रॅक्टिकल पेपर ही असतो. या देशातील ही एक चांगली गोष्ट आहे की प्रौढ व्यक्ती कितीही वेळा डीएलची परीक्षा देऊ शकेल. हेच कारण होते की या व्यक्तीने वयाच्या ३० वर्षांपासून ते ५० व्या वर्षांपर्यंत डीएल करण्यासाठी प्रयत्न केले.

हे लोकही वर्षांपासून शिकू शकले नाहीत ड्रायव्हिंग
ड्रायव्हिंग चाचणीत अनेक वेळा नापास झाल्याची ही पहिली घटना नाही. टीव्हीपीच्या अहवालानुसार, पोलंडमधील एका व्यक्तीने ड्रायव्हिंग टेस्ट उत्तीर्ण करण्यासाठी ४० वेळा प्रयत्न केले आणि देशाचे ओपोलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी ११३ परीक्षा द्याव्या लागल्या. या देशाच्या ४८ वर्षीय महिलेने ९३ चाचण्या दिल्या होत्या आणि त्या ९४ व्या परीक्षेत पास झाल्या. तेच इंग्लडमधील एका व्यक्ती १५७ वेळा फेल झाला आणि १५८ व्या चाचणीत तो चारचाकी गाडी चालवणे शिकला. यासाठी त्याला ३ लाख रुपये खर्च करावे लागले.