जीएसटी अधीक्षकांची ३० व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जीएसटी अधीक्षक हरेंद्र कपाडिया यांनी कुलाब्यातील वर्ल्ड सेंटरच्या ३० व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.

हरेंद्र कपाडिया यांना गेल्या काही महिन्यांपासून स्मृतीभ्रंशाचा आजार होता. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून ते रजेवर होते. जीएसटीचे कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर या इमारतीच्या ३० व्या मजल्यावर कार्यालय आहे. सोमवारी सायंकाळी ते कार्यालयात आले. सायंकाळच्या सुमारास त्यांनी ३० व्या मजल्यावरुन उडी मारली. त्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला.