अखेर मुंबईमध्ये उभारला बाळासाहेब ठाकरे यांचा 9 फूट उंच पुतळा !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackery ) यांची 23 जानेवारीला जयंती आहे. त्यानिमित्ताने मुंबईच्या कुलाबा परिसरामधील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackery ) यांचा 9 फूट उंच असा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणाराय.

या पुतळ्याच्या उभारणीचे काम मागील 4 वर्ष सुरू होते. मागील वर्षी या पुतळ्याचे काम पूर्ण झाले होते. परंतु, जी जागा मुंबई महापालिकेने ठरवली होती. त्यावर स्थानिकांनी आक्षेप घेतला होता म्हणून ही जागा बदलून घेतली होती. परंतु, नव्या जागेसाठी ही नवीन परवानगी मिळवी लागणार होती. याचे काम पूर्ण होईपर्यंत 23 जानेवारी 2020 हा दिवस निघून गेला होता. अखेर यावर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीला मुहूर्त सापडलाय.

23 जानेवारी 2019 ला आता या पुतळ्याचे अनावरण केले जाणाराय. प्रसिद्ध शिल्पकार शशिकांत फडके यांनी हा पुतळा तयार केला आहे. त्याचे काम जोगेश्वरी मातोश्री क्लब पूर्ण केले आहे. सध्या हा पुतळा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात चौथर्‍यावर उभा केला आहे. या चौथर्‍याखाली बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणाची सुरुवात करत असताना या ओळींचा वापर करायचे, त्या ओळी कोरण्यात आल्या आहेत. ’जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ असे हे शब्द आहे. या पुतळ्याचा चेहरा हा मंत्रालयाच्या दिशेने तर पाठ वास्तूसंग्रहालयाच्या दिशेने आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या शब्दांनी यांचे भाषण संपवायचे ते शब्द म्हणजे ’जय हिंद, जय महाराष्ट्र’ हे सुद्धा या पुतळ्याखाली असलेल्या चौथर्‍यावर कोरले आहेत. 23 तारखेला होणार्‍या कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण दिलंय. हे निमंत्रण विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही दिलंय. राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या स्वतः कृष्णकुंजवर गेल्या होत्या. राज ठाकरे यांनी कार्यक्रमाला येणार आहे, असे आश्वासन दिल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलीय.