गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जाणाऱ्या बँड पार्टीच्या पिकअपला अपघात 

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाईन

सिंदखेडराजा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत वाद्य वाजविण्यासाठी जात असलेल्या बँड पार्टीवर काळाने घाला घातला आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील भर जहागीर येथील बँड पार्टीच्या वाहनास भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. लोणार तालुक्यातील ब्राह्मण चिकना गावाजवळ नागपुर-मुंबई महामार्गावर अाज (रविवार) पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a37ec873-bef5-11e8-a755-53b7e4d823fe’]

सिंदखेडराजा येथे गणपति विसर्जनासाठी बँड पार्टी जात होती. वाशिम जिल्ह्यातील भरजहागीर येथील पिकअपमध्ये दहा ते बारा जण जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. लोणार तालुक्यातील ब्राह्मण चिकना गावाजवळ लक्झरी बस व पिकअपमध्ये जोरदार धडक होऊन ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर आठ जण गंभीर जखमी झाले. हे सर्व जण वाशिम जिल्ह्यातील भरजहागीर येथील रहिवासी आहेत. या अपघातात अरूण संजय कांबळे (वय २२), राजु भगवान कांबळे (वय २५), ज्ञानेश्वर वामन डोंगरे (वय २०) यांच्यासह आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी बीबी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गुंतवणूकदारांना ५५ लाखांचा गंडा घालणाऱ्या मातृभूमी फायनान्सकडे पोलिसांचे दुर्लक्ष