Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये वांद्रे स्टेशनजवळ गर्दी करणार्‍या विनय दुबेला जामीन मंजूर

पोलिसनामा ऑनलाईन – वांद्रे स्टेशनबाहेर 14 एप्रिल रोजी हजारो लोकांची गर्दी झाली होती. घरी जाण्यसाठी विशेष ट्रेन सोडा अशी मागणी या सगळ्या जमावाने केली होती. या प्रकरणी लोकांना व्हिडीओद्वारे जमण्याचे आवाहन करणार्‍या विनय दुबेला अटक करण्यात आली होती. त्याला आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. वांद्रे कोर्टाने 15 हजाराच्या जातमुचलक्यावर विनय दुबेला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मुंबईतील वांद्रे स्टेशन बाहेर 3 ते 4 हजार परप्रांतीयांचा जमाव जमा झाला होता. या जमावाला वांद्रे स्टेशनबाहेर जमवण्यासाठी कारणीभूत विनय दुबे असून त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.दुबेचा मुंबईत मजुरी करणार्‍या उत्तर भारतीय आणि पश्चिम बंगालच्या मजुरांशी दांडगा जनसंपर्क असून तो उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष आहे. 14 एप्रिलचा लॉकडाउन 3 मे पर्यंत वाढवण्यात आला. तरीही 14 एप्रिल रोजी वांद्रे स्टेशन बाहेर मोठी गर्दी केली होती. या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला होता. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाउन असल्याने ट्रेन, बससह इतर सगळ्या वाहतुकीच्या सेवा बंद आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेले अनेक कामगार मुंबईतच अडकले होते. हेच कामगार मुंबईतील वांद्रे स्टेशनवर 14 एप्रिल रोजी जमा झाले होते. या सगळ्या गर्दीला कारणीभूत ठरलेल्या विनय दुबेला अटक करण्यात आली होती. आता आज त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.