नवा अहवाल : ‘लॉकडाऊन’नंतर सर्व स्थिरस्थावर होण्यास 9 ते 12 महिने लागणार, जाणून घ्या नेमकं काय म्हंटलंय रिपोर्टमध्ये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशासह राज्यात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेतेची चाकं थांबली आहेत. लॉकडाऊनचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. खासकरून उद्योग क्षेत्रातील उद्योगांना आणि बांधकाम व्यावसायिकांना याचा फटका जास्त बसला आहे. लॉकडाऊननंतर स्थिरास्थावर होण्यास किमान 9 ते 12 महिने लागतील, असे महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इडस्ट्रीच्या (क्रेडाई-एमसीएचआय) नव्या अहवालात म्हटलं आहे.

क्रेडाई-एमसीआयने प्रश्नावलीच्या माध्यमातून 500 सदस्यांच्या माहितीच्या आधारावर हा अहवाल प्रकाशित केला आहे. या संशोधन अहवालात असे दिसून येते की, 60 टक्के विकासक मानतात की, लॉकडाऊननंतर 9-12 महिन्यांत रिअल इस्टेटचा व्यवसाय सामान्य होताना दिसेल तर केवळ 30 टक्के विकसकांच्या मते 6 महिन्यांत व्यवसाय सामान्य होतील. क्रेडाई-एमसीआयच्या सदस्यांनी यामध्ये सहभाग घेतला.

व्यवसाय न बदल्याच्या मनस्थितीत व्यावसायिक
नोटबंदी, रेरा, जीएसटी अशा अनेक संकटांचा रिअरल इस्टेट सामना करत असताना देशात कोरोना व्हायरसने डोके वर काढले आणि व्यवसायाबरोबरच व्यावसायिकांचे कंबरडे मोडले. मात्र, तरीही 83 टक्के व्यावसायिक आपला व्यवसाय न बदलता बांधकामात राहून इच्छितात असं या अहवालावरून समोर आलं आहे. बांधकाम व्यावसायिक मागील तीन वर्षापासून अनेक अडचणींना तोंड देत आहेत. असे असतानाही या अहवालानुसार 83 टक्के व्यावसायिक अजूनही आपल्या व्यवसायावर कायम असल्याचं क्रेडाई-एमसीआयआयचे अध्यक्ष नयन शहा यांनी सांगितले.

तर मालमत्ता संपादित करण्याची तयारी
नयन शहा यांनी सांगितले की, रिअल इस्टेट उद्योग भारतातील इतर उद्योगांप्रमाणेच स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडत आहे. त्यामुळे हा एक महत्त्वपूर्ण संशोधन अहवाल मानला पाहिजे. या सर्वेक्षणानुसार 83 टक्के विकासकांनी आपल्या उद्योगाशी दृढता आणि आत्मविश्वास दाखवून याच व्यवसायात राहून पुढे जाण्यास पसंत केले आहे. तर योग्य किंमत मिळाल्यास जवळपास 50 टक्के नवीन मालमत्ता संपादित करण्याची तयारी दाखवली आहे. तसेच 2021 पर्यंत निवासी क्षेत्रात प्रकल्प सुरु करण्याची इच्छाही दर्शवली आहे.

करमणूक क्षेत्रात व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न
साईटवर कामगार आणि कुशल कारागिरांची कमतरता असूनही बरेच विकासक आपला प्रकल्प कसा पूर्ण होईल याकडे लक्ष केंद्रीत करताना दिसत आहेत. या सर्व्हेमध्ये विशेष गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे 95 टक्के विकासक Essential Commodities Sector किंवा करमणूक सारख्या क्षेत्रामध्येही आपला व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. यातील एक मनोरजंक शोध म्हणजे 100 टक्के विकासक आवश्यक वस्तू क्षेत्रात किंवा करमणूक इत्यादी क्षेत्रातही आपला व्यवसाय वाढविण्याकडे पहात आहेत.

काही विकासक एक धोरणात्मक पवित्रा घेत एकमेकांच्या सहकार्य़ाने आणि भागिदारी करत प्रकल्प करताना दिसत आहेत. तसेच ते बार्टर एग्रिमेंट करू शकतील असे सप्लायर्स आणि व्हेंडर्शना प्राधान्य देत आहेत. या संशोधन अहवालात अनेक आर्थिक, सरकारशी संबंधित, कामगारांशी निगडीत, प्रकल्प पूर्ण करण्याबाबतचे आणि ग्राहकांशी संबंधित रणनीती नमूद करण्यात आल्या आहेत.

काय आहे क्रेडाई-एणसीएचआय ?
महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीची स्थापना 1982 मध्ये झाली. मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील ही प्रमुख आणि मान्यताप्राप्त संघटना आहे. बांधकाम विकास क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांना क्रेडाई एमसीएचआय एका व्यासपीठावर आणून या उद्योगांना बेडसावणाऱ्या समस्यांचा निराकरण ही संस्था करते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like