‘हा’ आहे खऱ्या आयुष्यातील मोगली 

रिओ डी जनैरो : वृत्तसंस्था – आजपर्यंत आपण मोगलीच्या कथा किंवा टारझन पाहिला आहे टीव्हीवर. अशा गोष्टी आपल्याला नेहमीच आश्चर्यचकित करत असतात. कारण एखादा मानव वन्य पशूंसोबत राहतो हे आपल्याला चकित करणारं असतं. पंरतु मोगली किंवा टारझनसारखी माणसंही या जगात अस्तित्वात आहेत. मानवी सहवासात असलेल्या वन्य प्राण्यांसमवेत लहानपण घालवणारीही अनेकजण आहेत. असेच एक उदाहरण समोर आले आहे. एक मुलगा लहानपणापासून जग्वारसोबत राहत आहे. विशेष म्हणजे हा मुलगा अवघा बारा वर्षांचाच आहे.

टियागो सिलवेइरा असं या मुलाचं नाव आहे.  टियागोचे संपूर्ण बालपण अशा जग्वारसमवेत गेले आहे. टियागोचा जन्म हा ब्राझीलमध्ये झाला आहे. टियागोचे आई-वडील हे जीवशास्त्रज्ञ आहेत. ब्राझीलच्या एका संस्थेमध्ये ते दोघेही काम करतात. मांसभक्षक असलेला जग्वार हा कधीही माणसांवर हल्ला करत नाही, असे जीवशास्त्रज्ञ लियानार्डो सिलवेइरा यांनी सखोल संशोधन केल्यानंतर म्हटले आहे. यामुळे त्यांनी आपला मुलगा टियागोला जग्वारसमवेत वाढविले. 123 एकरांच्या भव्य जागेवर राहणार्‍या टियागोच्या कुटुंबाचे वास्तव्य अनेक जग्वारांच्या सान्निध्यात आहे. याठिकाणी 2002 मध्ये त्यांनी एका जग्वार संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेत 4 बछड्यांसह 14 जग्वार आहेत.

जग्वारच्या सवयी या वाघाशी अधिक मिळत्या-जुळत्या असतात. जग्वार म्हणजे बिबट्यासारखाच दिसणारा; पण त्यापेक्षा अधिक मोठ्या आकाराचा मार्जरकुळातील प्राणी.