रामेश्वरममध्ये आज दिसलं सूर्याचं अद्भूत दृश्य, 30 मिनीटं लोक ‘टक’ लावून बघत होते, तुम्ही देखील पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या दिवशी रामेश्वरमच्या समुद्र किनारी आज दुपारी सूर्याचे अद्भूत रूप पहायला मिळाले. किनार्‍यावर उपस्थित लोक सूर्याला पाहून आश्चर्यचकीत झाले. आकाशात चमकणारा सूर्य आज वेगळा दिसत होता. सूर्याच्या चारही बाजूला गोल रिंगण तयार झाले होते, ज्यास प्रभामंडळ (Halo) असे म्हटले जाते. स्थानिक लोकांनी अर्ध्या तासापेक्षा जास्तवेळ या अद्भूत दृश्याचा आनंद घेतला.

सूर्याच्या बाहेरील भागात, जी डिस्क (फोटोस्फियर) हजारो किलोमीटरपर्यंत पसरलेली असते, त्यास प्रभामंडळ म्हणातात. याचे तापमान मिलियन डिग्री केल्विनपेक्षा सुद्धा जास्त असते, जे सुमारे 6000 केल्विनच्या सौर डिस्क तापमानापेक्षा जास्त आहे. सौर भौतिकशास्त्रात याचे उत्तर अजून मिळालेले नाही की, कशाप्रकारे प्रभामंडळाचे तापमान इतके जास्त असते.

नासाने जारी केली होती सूर्याची अनोखी छायाचित्रे
मागील महिन्यात नासाने सूर्याचे असे व्हिडिओ शेयर केले होते, ज्याचे टायटल ए डिकेड ऑफ सन होते. नासाने जारी केलेल्या या व्हिडिओत सूर्याचे मागील दहा वर्ष अभ्यास केला होता. या व्हिडिओत 2 जून 2010 ते 1 जून 2020 पर्यंत अभ्यास केला होता. या दहा वर्षांदरम्यान सूर्यामध्ये झालेले बदल नासाने खुप जवळून नोंदले होते.

नासाने शेयर केलेल्या या व्हिडिओत अनेक प्रकारची हैराण करणारी माहिती होती. नासाने म्हटले होते की, सोलर ऑब्जर्वेटरीने 10 वर्षापर्यंत सूर्यावर नजर ठेवली होती, सोबतच सूर्याची 45 करोड हाय-रिझोल्यूशनची छायाचित्रे घेतली आणि दोन करोड गीगाबाईट डेटासुद्धा जमवला होता.