मानहानी’च्या केसमध्ये ‘फसली’ अभिनेत्री ईशा गुप्ता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अॅक्ट्रेस ईशा गुप्ताविरोधात एका बिजनेसमनने दिल्लीतील साकेत कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला आहे. 28 ऑगस्ट रोजी हा खटला कोर्टात चालणार आहे. हा तोच बिजनेसनमन आहे ज्याच्यावर काही दिवसांपू्र्वी ईशाने गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप केला होता.

ईशा आपल्या मैत्रिणींसोबत पार्टीला गेली असताना तिच्यासोबत गैरवर्तनाचा प्रकार घडला होता. ईशा गुप्ताने ट्विट केलं होतं की, “माझ्यासारखी महिला असुरक्षित आणि टार्गेट होऊ शकते तर बाकी मुलींचे का हाल होत असतील. आजूबाजूला दोन सेक्युरिटी गार्ड असूनही असं वाटत होतं की, कोणीतरी माझा रेप करत आहे.”

पुढे ट्विटमध्ये तिने लिहिले होते की, “त्या माणसाची बॉडी लँग्वेज मला खराब आणि असुरक्षित वाटण्यासाठी खूप होती. अशा लोकांना चांगलाच धडा शिकवायला हवा. हॉटेलच्या सेक्युरिटी कॅमेऱ्यातही या गोष्टीटा पुरावा उपलब्ध आहे की, या माणसाच्या हरकती वाईट होत्या.”

याशिवाय तिने इंस्टाग्रामला स्टोरीही शेअर केली होती ज्यात लिहिलं होतं की, “काही लोक खूपच असभ्य असतात. असं वाटतं त्यांना कधीच काही कळणार नाही. ते कधीच शिकणारही नाही की, कसं वर्तन करावं. या लोकांना पद्धत शिकवायला हवी.”

ईशाने लिहलं होतं की, “माझ्या पूर्वीच्या पोस्टबद्दल… हा माणूस माझा डोळ्यांनीच माझा बलात्कार करत होता. हे बरं झालं की, माझी सेक्युरीटी दक्ष आणि शांत होती. कोणी या माणसाला ओळखतं का? या माणसाला नीट वर्तणूक करण्यासाठी तीन वेळा सांगण्यात आलं होतं. माझ्यासोबत 2 गार्ड होते. सेक्युरिटी कॅमेऱ्यातून या गोष्टीला कंफर्म केलं जाऊ शकतं. कोण आहे हा भविष्यातील बलात्कारी.

आता हे प्रकरण कोर्टात पोहोचले आहे. हे पाहणं महत्त्वाचं आहे की, आता ईशाविरोधात दाखल झालेल्या या खटल्याबाबत काय उत्तर देते.

आरोग्यविषयक वृत्त

सुंदर दिसण्यासाठी घरीच करा ‘हे’ ४ प्रकारचे फेसिअल जेल.

जाणून घ्या, अ‍ॅपल सिडर व्हिनेगरचे नुकसान

‘या’ वेळा पाळा, पुन्हा कधीही होणार नाही अपचनाची तक्रार

पहिल्यांदा आई झाल्यानंतर नकळत होतात ‘या’ चुका, जाणून घ्या

‘या’ टेस्टमुळे समजेल तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात की नाही ? जाणून घ्या

महिलांनी गरोदरपणात व्यायाम केल्याने होतील ‘हे’ खास फायदे

पावसाळ्यात फिट राहण्यासाठी ‘हा’ आहार घ्या, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like