खळबळजनक ! दिव्यांग मुलांच्या शाळेत मुलामुलींना एकत्र निर्वस्त्र आंघोळ घातली, 13 जणांवर FIR, महाराष्ट्रातील घटना

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – दिव्यांग मुली- मुलांना चक्क नग्नावस्थेत एकत्र आंघोळ घातली असल्याची घटना औरंगाबादजवळील जटवाडा भागातील शरद पवार दिव्यांग मुलांच्या शाळेत घडली आहे. याप्रकरणी औरंगाबाद हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

औरंगाबाद जटवाडा रोडवर शरदचंद्र दिव्यांग मुलांची निवासी शाळा आहे. या शाळेतील एक व्हिडिओ घृणास्पद व्हायरल झाला आहे. मुला-मुलींना नग्नावस्थेत आंघोळ घातली असल्याचे दिसून आले आहे. या शाळेत 1 ते 17 वयोगटातील 35 ते 40 विद्यार्थी असून ते निवासी शाळेत राहतात. समाजकल्याण निरीक्षकांच्या अचानक दिलेल्या भेटी मधून ही गंभीर बाब समोर आली आहे. याबाबत हा व्हिडिओ बनवणार्‍या व्यक्तीने केअरटेकरला विचारले असता केअरटेकरने रोज याच पद्धतीने अंघोळ घातले जात असल्याची कबुली दिली आहे. हा व्हिडिओ 13 मार्च 2020 ला बनवण्यात आला आहे. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू होती आणि आता समाज कल्याण निरीक्षक यांच्या तक्रारीनंतर शाळेच्या मुख्याध्यापकासह व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 13 आरोपींवर दिव्यांग व्यक्ती हक्कभंग अधिनियम 2016 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like