संचारबंदीचे उल्लंघन करणारे भाजप आमदार सुरेश धस यांच्या विरुद्ध संचारबंदी उल्लंघनाचा गुन्हा

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे. सर्वांना संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असताना ऊसतोड मजुरांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे गेलेल्या आमदार सुरेश धस यांच्याविरुद्ध पोलिसांनी संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

संचारबंदीच्या काळात संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा आमदाराविरोधात राज्यात हा पहिलाच गुन्हा आहे. सुरेश धस हे विधानपरिषदेचे आमदार आहेत.  भिगवण येथे बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच आमदार सुरेश धस हे जिल्ह्याच्या सीमा ओलांडून त्यांच्या मदतीसाठी गेले होते. संचारबंदीच्या काळात जिल्हा बंदीचे आदेश आहेत. त्यामुळे आमदार धस यांनी संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांच्याविरोधात कलम १८८, २६९, २७०, ५१ (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like