लाच मागणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबल विरुध्द गुन्हा दाखल

अहमदनगर :  पाेलीसनामा ऑनलाईन

मोबाईल संदर्भात दाखल गुन्ह्यात सहकार्य केल्याच्या बदल्यात मुलीच्या पित्याला ५ हजार रूपयांची लाच मागणाऱ्या येथील सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल आकाश अनिल भैरट याच्याविरोधात बुधवारी (दि.१२) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
[amazon_link asins=’B0756RF9KY,B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c7fd5e9b-b6a5-11e8-9e89-0d83676c4906′]

याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्याम पवरे यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सायबर पोलीस ठाण्यात एका मुलीच्या मोबाईल संदर्भात तक्रार दाखल होती. या प्रकरणात भविष्यात तिला अडचण येऊ नये म्हणून प्रकरण मिटवल्याने व त्या साठी सहकार्य केल्याच्या मोबदल्यात भैरट याने ५ हजारांची लाच मागितली होती. याप्रकरणात मुलीच्या ५१ वर्षीय वडिलांनी अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. लाचेची मागणी केल्या प्रकरणी आकाश भैरट याच्या विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी