महाराष्ट्राचा रौनक मुजुमदार ‘कॅट’मध्ये देशात पहिला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरातील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटमधील व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेत (कॅट २०१८) महाराष्ट्राचे उमेदवार राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. १०० पर्सेटाइल मिळवलेले सर्वाधिक म्हणजे सात उमेदवार महाराष्ट्राचे आहेत. आयआयटी कानपूरमधून अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या रौनक मुजुमदारने देशात पहिला क्रमांक पटकावला.

आयआयएम कलकत्ताने नमूद केले आहे की, कॅटचा निकाल आयआयएम पहिला आलेल्या रौनक मुजुमदारने प्रतिक्रिया देताना म्हटले की, माझा सर्वाधिक भर सराव परीक्षेवर होता. वर्षभरात मी जवळपास चाळीस सराव परीक्षा दिल्या. सराव परीक्षा दिल्यानंतर त्याचे विश्लेषणही मी करायचो. परीक्षा देण्यापेक्षा त्याचे विश्लेषण जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे माझ्यातील उणिवा मला नेमकेपणाने कळल्या आणि परीक्षेसाठी मी नियोजन करू शकलो. कॅट ही स्मरणावर आधारित परीक्षा नाही, तर कल, हुशारी आणि माहितीच्या उपयोगावर आधारित आहे. या परीक्षेसाठी वेळेचे नियोजनही महत्त्वाचे आहे.

कलकत्तातर्फे संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. देशभरातील २ लाख ९ हजार ४०५ उमेदवारांनी १४७ शहरांतील केंद्रांवर परीक्षा दिली. त्यात १ लाख ३६ हजार मुले आणि ७३ हजार ३२६ मुलींचा समावेश होता. या वर्षी चार तृतीयपंथी उमेदवारही उत्तीर्ण झाले. आधीच्या वर्षांच्या तुलनेत परीक्षा देणाऱ्यांचे प्रमाण या वर्षी सर्वाधिक होते.

अभियांत्रिकी शाखेच्याच उमेदवारांनी या परीक्षेत अग्रस्थान मिळवल्याचे स्पष्ट झाले. १०० पर्सेटाइल मिळवलेले सर्व ११ उमेदवार अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान शाखेचेच आहेत. तर, ९९.९९ पर्सेटाइलसह दुसरा क्रमांक मिळवलेल्या २१ उमेदवारांपैकी १९ उमेदवार अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान शाखेचेच आहेत. स्वाभाविकपणे आयआयएममध्ये प्रवेश मिळवण्यात अभियंतेच आघाडीवर असल्याचे दिसून आले. आयआयटी दिल्लीच्या अनुभव गर्गने ९९.९९ पर्सेटाइलसह द्वितीय क्रमांक मिळवला.