‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटू विरोधात हुंडा आणि लैंगिक छळ प्रकरणी गुन्हा दाखल

कोलकत्ता : वृत्तसंस्था – भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीवरच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. शमीवर हुंडा मागणे आणि लैंगिक छळ करणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्याचे वर्ल्ड कप खेळणे धोक्यात आले आहे. पत्नी हसीन जहाँने मोहम्मद शमीविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची आणि लग्नानंतर इतर स्त्रियांशी संबंध ठेवल्याचा आरोप करत याचिका दाखल केली होती.

हसीन जहाँने काय आरोप केले होते ? – हसीन जहाँने तिचा पती मोहम्मद शम्मीविरोधात विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा, घरगुती हिंसाचार, बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्यासोबतच अनेक गंभीर आरोप केले होते . तसेच व्हॉट्सअॅप, फेसबुक मेसेंजरवरचे मेसेज यांचे स्क्रीन शॉट पोस्ट करत त्याचे दुसऱ्या महिलांशी संबंध असल्याचा आरोप केला होता .


मोहम्मद शमीच्या कुटुंबीयांनी मला ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचाही आरोप हसीन जहाँने केला होता. हसीन जहाँने शम्मी मॅच फिक्सिंगमध्येही सामील असल्याची शक्यता व्यक्त केली होती . आता या सगळ्या प्रकरणांपैकी त्याच्याविरुद्ध आयपीसी कलम 498 A नुसार हुंड्यासाठी छळ केल्याचा तसेच कलम 354 A नुसार लैंगिक शोषण करणे या दोन प्रकारात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us