मांजा मानेभोवती गुंडळला गेल्याने मुलाचा मृत्यु

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन  – पतंग उडवताना चायनिज मांजा मानेभोवती गुंडाळला गेल्याने सात वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाला. धामणगाव रेल्वे शहरात ही घटना घडली. वेदांत पद्याकर हेंबाडे असे या सात वर्षाच्या मुलाचे नाव आहे. वेदांत हा धामणगाव रेल्वे शहरात पहिलीचा विद्यार्थी होता.

हेंबाडे कुटुंबीय मुलाच्या शिक्षणासाठी धामणगाव रेल्वे शहरात राहतात. वेदांत याने पतंग उडविण्याचा हट्ट केल्याने वडिलांनी त्याला पतंग व मांजा आणून दिला. वेदांत हा गच्चीवर पतंग उडवत असताना त्याच्या मानेला मांजा गुंडाळला गेला. मान कापल्याने गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला वसाड गावी उपचार करण्यात येत होते.

मात्र, त्याची प्रकृती खालावल्याने त्याला अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यु झाला. संक्राती सणाच्या तोंडावर वेदांतचा मृत्यु झाल्याने वसाड गावावर शोकळा पसरली आहे. वेदांतच्या पश्चात आई वडिल, दोन बहिणी असा परिवार आहे.
चायनिज आणि नॉयलॉन मांजावर बंदी असताना त्याची सर्रास विक्री केली जात आहे़ त्यातूनच अशा दुदैवी घटना घडत असल्याचे समोर आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like