पाकच्या सीमकार्डसह भारतीय नागरिकाला सीमेवर अटक 

पंजाब : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तान आणि भारतातील वातावरण तणावाचे झाले आहे. देशातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पंजाबमधील फिरोजपूरमध्ये बीएसएफने सीमाहद्दीत एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पाकिस्तानी सिम कार्ड जप्त करण्यात आले आहे.

बीएसएफने ताब्यात घेतलेली व्यक्ती ही भारतीय नागरिक आहे. हा व्यक्ती मुळचा युपीमधील मुरादाबादचा आहे. त्याच्याकडे पाकिस्तानी सीम कार्ड आढळून आले. त्यानंतर त्याचा फोन आणि सीम कार्ड जप्त करण्यात आले. जप्त केलेला तो फोन नंबर पाकिस्तानमधील ८ व्हॉट्सअँप ग्रुपमध्ये सामील आहे. तसंच त्याच्याकडून अजून ६ नंबर घेण्यात आले आहेत.

दरम्यान, भारताने देशात हायअर्लट जारी केला आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये, विमानतळे, रेल्वे स्टेशन्सवर हायअर्लट देण्यात आले आहे. तसंच त्यानंतर देशातील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.